शिवसेना पदाधिकारी संवाद दौरा, पहा कोण कोणत्या मतदार संघात असेल दौरा !
• पदाधिकारी संवाद दौरा •
शिवसेना सचिव, उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांचा दि. 30 जुलै 2024 ते दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी “उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकारी संवाद दौरा” आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी, निवडणूक नियोजन संबंधी शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागातील विधानसभा निरीक्षक व प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधणार असून खालील प्रमाणे असेल नियोजित दौरा..
30 जुलै 2024, मंगळवार
चांदवड देवळा विधानसभा (नाशिक)
• शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळी 10.00 वाजता
31 जुलै 2024, बुधवार
• धुळे शहर विधानसभा (धुळे)
सकाळी 10.00 वाजता
1 ऑगस्ट 2024, गुरुवार
• जळगाव ग्रामिण विधानसभा (जळगाव)
सकाळी 10.00 वाजता
1 ऑगस्ट 2024, गुरुवार
• मुक्ताईनगर विधानसभा (जळगाव)
दुपारी 02.00 वाजता
2 ऑगस्ट 2024, शुक्रवार
• एरंडोल विधानसभा (जळगाव)
सकाळी 10.00 वाजता
—————————— ————–
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या वतीने पहिल्या टप्प्यात एकूण 113 विधानसभा मतदार संघात 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या असून जळगाव ग्रामीण चोपडा व मुक्ताईनगर अशा तीन मतदारसंघाची पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातून वर्णी लागल्याचे दिसून येत असून या तिघेह मतदारसंघांचीस विधानसभा निरीक्षक म्हणून गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.