निधन वार्ता, अमोल रामभाऊ इंगळे यांचं दुःखद निधन
मुक्ताईनगर — शहरातील ई के टॅलेंट स्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अमोल रामभाऊ इंगळे वय 32 वर्षे यांचे आज सकाळी नऊ वाजता आकस्मिक निधन झाले. निधनामुळे सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथील अमोल रामभाऊ इंगळे (वय 32 वर्षे )यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यानंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले ते मुक्ताईनगर येथील ई के टॅलेंट स्कूल येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते ते भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सचिव चंद्रमणी इंगळे सर यांचे पुतणे तर यावल तालुक्यातील न्हावी येथील हायस्कूल येथे उपशिक्षक गोकुळ इंगळे यांचे लहान बंधू होत त्यांचे पश्चात आई तीन भाऊ काका असा परिवार आहे.