जळगावात शिवसेनेच्या सोशल मीडिया पदाधिकारी मुलाखती उत्साहात पार; सोशल मिडिया टीमला मिळाली राज्यातील पहिली कॅबीन
शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव मयुर मगर-पाटील यांच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया पदाधिकारी मुलाखती व नियुक्ती संपर्क दौऱ्याचा शुभारंभ गुरुवारी दि.18 सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव येथे झाला. या निमित्ताने शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात भव्य व उत्स्फूर्त वातावरणात बैठक व मुलाखती पार पडल्या.
या कार्यक्रमास मा. जि.प. सदस्य प्रतापदादा गुलाबराव पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख संतोष पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र गवळी, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा सोशल मीडिया रावेर लोकसभा प्रमुख शिवराज चौधरी-पाटील, जळगांव लोकसभा प्रमुख राकेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पदाधिकारी मुलाखतींच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळून पक्षाची डिजिटल उपस्थिती अधिक प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना सोशल मीडिया विभागा साठी पालकमंत्री महोदय यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रथम स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून दिली .
या कार्यक्रमामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून “आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात पक्षाची सोशल मीडिया ताकद अधिक प्रभावीपणे उभारली जाईल, “असा निर्धार व्यक्त करण्यात आला.