संत मुक्ताबाई जन्मोत्सव सोहळा उद्या घटस्थापनेच्या पवित्र दिवशी – श्रीक्षेत्र कोथळी येथे दुर्गा सप्तशती व मुक्ताई विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन
मुक्ताईनगर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलप्रसंगी, अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी, संत परंपरेतील तेजस्वी संत, संत मुक्ताबाई यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या पावन दिनाच्या निमित्ताने, संत मुक्ताई यांच्या मूळ समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे, सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ तसेच संत मुक्ताई विजय ग्रंथ पारायण यांचे महाभव्य आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदा ,
दि.22 सप्टेंबर 2025 वेळ ठीक सकाळी 10:00 वाजता पारायणास सुरुवात होईल..
अध्यात्मिक ऊर्जेने भारलेला पारायण सोहळा
परम पूज्य आदरणीय श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली,
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित,
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तापी-पूर्णा परिसर सेवेकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
‘मुक्ताई चंडी सेवा’ अंतर्गत हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे.
या सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी सहभागी होणार असून,
संपूर्ण परिसरात अध्यात्मिक स्पंदनांची अनुभूती देणारे वातावरण निर्माण होणार आहे.
भाविकांना साद – या, सहभागी व्हा, भक्तिरसात न्हावून निघा
या विशेष निमित्ताने,
श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील,
संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे महाराज,
उद्धव महाराज जुनारे, पुरुषोत्तम वंजारी, सुधीर कुलकर्णी, शेखर पाटील, सुभाष पाटील,
तसेच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील याज्ञिकी महिला व पुरुष सेवेकरी
यांच्या वतीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे सादर आवाहन करण्यात आले आहे.
“मुक्ताईच्या चरित्रातून आत्मोन्नतीचा मार्ग…” 
या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संत मुक्ताईंच्या पावन चरित्राचे सामूहिक पारायण करत,
त्यांच्या विचारांची व आध्यात्मिक शिकवणीची नवीन पिढीशी नाळ जोडण्याचा
हा एक पवित्र प्रयत्न ठरणार आहे.
या आध्यात्मिक महापर्वाचा लाभ घ्या आणि मुक्ताईमातेसमोर भावपूर्ण अर्घ्य अर्पण करा.