उन्हाची अजूनही तीव्रता,त्यामुळे दुपारची शिफ्ट न करता स.७ ते ११ वाजेपर्यंत शाळेची वेळ ठेवावी – आ.चंद्रकांत पाटील 

ei_1665492500723-removebg-preview

उन्हाची अजूनही तीव्रता,त्यामुळे दुपारची शिफ्ट न करता स.७ ते ११ वाजेपर्यंत शाळेची वेळ ठेवावी – आ.चंद्रकांत पाटील

[metaslider id="6181"]

मुक्ताईनगर : पाऊस लांबणीवर गेल्याने सध्या सूर्य प्रचंड आग ओकतोय, सकाळी ११ नंतर घराच्या बाहेर निघणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व इतर माध्यमिक शाळा भर उन्हात दुपारी बारा वाजता भरत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच तापमान इतके प्रचंड आहे की शरीरात पाण्याची कमतरता होऊन  उन्हामुळे काही झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला धारेवर धरले तसेच नुकतीच सुरू झालेले शालेय शिक्षण सत्र २०२३-२४ या काळात दुपारची शिफ्ट न करता ही शिफ्ट सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भरविण्यात यावी अशी लेखी मागणी पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक शिक्षण) यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!