मुक्ताईनगर मतदार शून्य तसेच एक शिक्षकी शाळा झाल्याने विद्यार्थ्यांचे होतंय नुकसान ,

20230616_164236
मुक्ताईनगर मतदार शून्य तसेच एक शिक्षकी शाळा झाल्याने विद्यार्थ्यांचे होतंय नुकसान ,
तात्काळ शिक्षकांची रित्क पदे भरा अन्यथा जिल्हा परीषद शाळांना कुलूप ठोकण्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा !
मुक्ताईनगर :  माझ्या मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांसह इतर रिक्त पदे तसेच शून्य व एक शिक्षकी शाळा यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यामुळे तात्काळ रिक्त पदांचा भरणा करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद शाळांना कुलूप ठोकण्याचा गंभीर इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या पत्रात  दिला आहे.
      त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षण विभागात मराठी व उर्दू माध्यम मिळून गटशिक्षणाधिकारी १. शिक्षण विस्तार अधिकारी-३ (रिक्त-२), केंद्रप्रमुख-१० (रिक्त-८), ग्रेटेड मुख्याध्यापक ३० (रिक्त-८), पदवीधर शिक्षक – ५९ ( रिक्त-२३) उपशिक्षक – ३५५ (रिक्त-११५) असे एकूण ४५८ पैकी ३०१ पदे भरलेली असून १५७ पदे रिक्त असल्यामुळे आज रोजी मराठी माध्यमाच्या ६ शाळा विना शिक्षकांच्या आहेत. त्यातच मराठी माध्यमाच्या १७ या शाळा एक शिक्षकी आहेत.
तसेच बोदवड तालुक्यात मराठी व उर्दू माध्यम मिळून गटशिक्षणाधिकारी-१ (रिक्त -१), शिक्षण विस्तार अधिकारी-२ (रिक्त-१), केंद्रप्रमुख-५ (रिक्त-३), ग्रेटेड मुख्याध्यापक १३ (रिक्त-४), पदवीधर शिक्षक-३३ (रिक्त-१४) उपशिक्षक १७८ (रिक्त-४५) असे एकूण २३२ पैकी १६४ पदे भरलेली असून ६८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशी पदांची संख्या रिक्त असल्यामुळे माझ्या मतदार संघातील ग्रामीण भागातील गोरगरीब व शेतकल्प ची मुले शिक्षणापासून वंचित राहत असून हि रिक्तपदे तात्काळ भरण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी अन्यथा येत्या ५ ते ६ दिवसात मी स्वतः मतदार संघातील सर्व शाळांना टाळे ठोकणार याची नोंद घ्यावी अशा गंभीर इशारा त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण प्रशासनाला दिला आहे.
तसेच ना.दिपक केसरकर, मंत्री- शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई, म. संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे जि. पुणे. म. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. जळगाव जि. जळगाव., म. सह संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग, नाशिक यांना माहिती स्तव प्रति पाठविण्यात आलेल्या आहेत.
error: Content is protected !!