आ.चंद्रकांत पाटील यांनी रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध समस्यांबाबत दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन ; मुख्यमंत्र्यांनी केली सकारात्मक चर्चा
आ.चंद्रकांत पाटील यांनी रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध समस्यांबाबत दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन ; मुख्यमंत्र्यांनी केली सकारात्मक चर्चा
मुंबई : फळबागाईतदार शेतकरी मंडळ, रावेर स्टेशन, ता. रावेर, जि. जळगांव यांचेतर्फे विविध समस्यांबाबत तसेच काही महत्वपूर्ण मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले यावेळी सर्व शेतकरी बांधवांसह आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली . यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकरी बांधवांशी चर्चा करतांना विविध मागण्यांबाबत सकारात्मक दाखविली.
फळबागाईतदार शेतकरी मंडळ, रावेर स्टेशन, ता. रावेर, जि. जळगांव यांच्या तर्फे दोन वेगवेगळ्या निवेदनात म्हटलेले आहे कि ,
1)चार हेक्टर पेक्षा जास्त केळी पिकविमा काढलेल्या त्रांत्रिक चुकीने काढला गेलेला आहे. कारण नियमा नुसार चार हेक्टर पर्यंत विमा काढणेची मर्यादा होती. परंतु असे असतांना विमा कंपनीच्या तांत्रिक चुकीचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत असून तरी त्या त्रांत्रिक चुकीने शेतकऱ्यांना त्या विम्याची रक्कम दिलेली नाही म्हणून चार हेक्टर पर्यंत नियमाच्या अधीन राहून चार हेक्टर पर्यंत विमा नुकसानभरपाई रक्कम मिळावी तसेच वेगवान वाऱ्याची नुकसान भरपाई रक्कम देखील मिळालेली नाही.
2) राज्यात महावितरण कंपनीजवळ कृषी पंपाची रीडिंग घेण्यासाठी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने अंदाजित युनिट टाकून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी होत असते . त्यामुळे हा प्रकार तातडीने थांबवून कृषिपंपाची वीज बिल आकारणी मध्यप्रदेश धर्तीवर हार्स पावर पद्धतीने व्हावी व त्यानुसारच बिल आकारणी व्हावी.
3) राज्यात गायरान शेतीविषयक नियम बदलून गायरान जमीन ग्रामपंचायत ताब्यात दिले त्या बद्दल आपले खूपखूप आभार त्याच प्रमाणे देवस्तान मोटकरी जमिनी विशेष देवस्तानच्या जमिनी कुळ कायद्यानुसार प्रतिबंद करून परत घ्याव्या व मोटकरी जमिनी 2 ग्रामपंचायत यांना परत करण्याविषयी निर्णय व्हावा.
४) त्याच प्रमाणे सोलर सिस्टम घरगुती व शेतीसाठी जास्तीतजास्त लोकांना सबसिडीचा विचार व्हावा त्या मुळे वीज वितरण कंपनीचा भार ककमी होऊन सर्वना चांगल्या दाबाने वीज मिळेल.
तसेच दुसऱ्या निवेदनात
रेल्वे व्ही.पी.यु. (V.P.U. ) रॅकच्या भाड्यामध्ये सवलत मिळणे बाबत महत्वाची मागणी करण्यात आलेली असून यात म्हटलेले आहे कि ,
(1) आम्ही रावेर ते आदर्शनगर (दिल्ली) साठी रेल्वे व्ही.पी.यु. रॅक मध्ये केळी माल नियमित पाठवित असतो. मागील वर्षी रेल्वे व्दारे व्ही. पी. यू. रॅक ला भाड्यामध्ये ५०% सवलत दिली जात होती. परंतु रेल्वेने ती सवलत आता माहे एप्रिल २०२२ मध्ये बंद केलेली आहे.
2) सदरची ५०% सवलत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान होत आहे. शेतकरी स्वतःचा माल स्वतः मार्केटला पाठवु शकत नाही. त्यामुळे त्याला योग्य तो भाव मिळत नाही व केळीचे भाव खुप कमी झालेले आहेत.
(3) रेल्वे व्दारे शेतकऱ्यांचा माल जलद मार्केट मध्ये पोहोचत होता, परंतु आत्ता शेतकऱ्यांचा केळी माल शेतातच पिकत आहे. तो नियमित कापला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे.
4) रावेर येथून दिल्लीला केळी पाठवण्याचा सुमारे १०० वर्षाचा इतिहास आहे. आज पर्यंत रेल्वे भाड्यात सवलत देत असल्यामुळे शेतकरी आपला माल बाजापेठेत जलद व कमी खर्चात पाठवू शकत होते. परंतु आता ते शक्य होत नाही. तरी सर्व शेतकऱ्यांची विनंती की, आम्हाला पुर्वीपासून मिळत असलेली रेल्वे भाड्यातील ५०% सवलत पुन्हा मिळावी व लवकरात लवकर व्ही.पी.यु. रॉक पुन्हा सवलतीत सुरु व्हावा अशी विनंती. निवेदनात केलेली आहे.
यावेळी रामदास त्र्यंबक पाटील (निंबोल), अनिल दत्तू पाटील (रावेर), पंडित जगन्नाथ चौधरी (वाघोदा) सतीश भास्कर पाटील (केऱ्हाळे) सतीश भास्कर पाटील (वाघोदा), गोपाळ मोतीराम पाटील (मेहून) रोहिदास चौधरी (मोरगाव) सुनील एकनाथ पाटील (सावदा) सुनील तुकाराम पाटील (रावेर), निळकंठ चौधरी (वाघोदा) लक्ष्मीकांत विश्वनाथ महाजन (वाघोदा) नारायण माधव पाटील (जामनेर) तसेच संदीप दत्तात्रय पाटील (मुक्ताईनगर), दीपक माळी(शेलवड ता.बोदवड) जाफर अली (मुक्ताईनगर) आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती.