दुचाकी अपघातात शेतकरी पती-पत्नी ठार
मुक्ताईनगर : कांद्याची रोप आणण्यास गेलेल्या शेतकरी पती पत्नीच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुईखेडा ता. मुक्ताईनगर येथील मोटरसायकल स्वार शेतकरी असलेले वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रणथम फाट्यानजीक घडली होती.
मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेड येथील निना ज्ञानदेव नारखेडे (६५). सुनीता निना नारखेडे (५९) हे पुर्णाकाठावरील दूधलगाव येथे साळ भावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते. परतीच्या मार्गाने रूईखेड येथे घराकडे जात असताना रणथम फाट्यानज़ीक त्यांच्या दुचकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, त्यात दोघ पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.