जिजाऊ जयंती व मकर संक्रांत कार्यक्रमांत आ.चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?
व्हिडीओ पहा
युट्यूब व्हिडिओ लिंक Click Here
फेसबुक व्हिडिओ लिंक Click Here
मुक्ताईनगर येथे सकल मराठा समाज व शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर दि.१४ जानेवारी २०२५ रोजी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत मासाहेब जिजाऊ प्रतिमा पूजन तसेच आ.चंद्रकांत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच मराठा दिनदर्शिकेचे प्रकाशन झाल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.
बैठकीत आगामी १९ फेब्रुवारी रोजी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बद्दल सखोल चर्चा करण्यात येवून प्रवर्तन चौक सजविने , ढोल ताशे, लेझीम पथक , शिवव्याख्यातांचे शिवचरित्र व्याख्यान, भगवे ध्वज , पताका , शहरात मिरवणूक आदी विषयासंबंधी नियोजन करण्यात आले तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यती असा भव्य अश्वारूढ पुतळा मोठ्या थाटात आणि सन्मानात बसविला तसेच शिवसृष्टी चे काम प्रगती पथावर असून या गौरवशाली कामांबद्दल आमदार महोदयांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शिवजयंती उत्सव पूर्व तयारी साठी बद्दल आणखीन बैठका घेण्याचे ठरले.
यावेळी आ.चंद्रकांत पाटील, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील,पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, मुक्ताईनगर सकल मराठा समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख, कुऱ्हा विभाग सकल मराठा समाज अध्यक्ष, तसेच शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, सकल मराठा समाज तालुका सचिव यु डी पाटील सर, मराठा वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, राम रहीम रोटीचे अध्यक्ष किशोर गावंडे, मुक्ताईनगर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन (बंटी) जैन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा भोई समाज तालुकाध्यक्ष छोटू भोई , मुस्लिम समाज मनियर बिरादरी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, नगरसेवक डॉ. प्रदिप पाटील, पुरनाड माजी सरपंच रामभाऊ पाटील, मुक्ताई इलेक्ट्रॉनिकचे संचालक श्रीकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, चिखली सरपंच वैभव पाटील,शेमळदा दिलीप श्रीराम पाटील, इच्छापुर सरपंच गणेश थेटे पाटील, संत तुकाराम महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष छबिलदास पाटील, डॉ.पवन बनिये, राजू बंगाळे, प्रविण डहाके, तरोडा विजय पाटील, घोडसगाव प्रमोद अमलदार, चांगदेव माजी सरपंच पंकज कोळी, सरपंच डी.के पाटील सर , दीपक जाधव,लोहारखेडा भागवत चौधरी, भोटा शैलेश पाटील, तालखेडा दीपक वाघ, वडोदा विनोद दयाराम पाटील, सतिष नागरे, मालखेडा किशोर माणिकराव पाटील, भूषण पाटील, शेख सलीम शेख रहीम, दिनकर पाटील, सुधाकर पाटील, मोहन पाटील, सुनील महाजन, गोपाळ पाटील, निवृत्ती ढोले, तालुका अध्यक्ष रा का.जितु पाटील, मनोज पाटील, खामखेडा प्रभाकर अण्णा पाटील, मुक्ताईनगर के डी पाटील, चंदन चौधरी, श्रीकृष्ण फुंडकर, भागवत पाटिल, साहेबराव पाटील, ललित बाविस्कर,श़ेमळदा संतोष देविदास पाटील, सारोळा ब्रिजलाल पाटील, इच्छापुर रामेश्वर येरडकर, हिरसिंग चव्हाण, दिलीप माळु पाटील, जितेंद्र मोहरे, वैभव कोल्हे, सचिन पाटील, गजानन पाटील ढोन आदींसह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.