Mangalwar Che Upay : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे आपले वेगळे वैशिष्ट्ये आहे. मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमानजी (Lord Hanuman) यांना समर्पित आहे. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. सुखी आणि समृद्ध जीवनासाठी या दिवशी काही अध्यात्मिक उपाय (Mangalwar Upay) केले पाहीजे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात. ज्योतिष शास्त्रात मंगळवारचे काही उपाय (Tuesday Remedy) सांगण्यात आले आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय केल्यास भगवान हनुमानाची कृपा लाभते. चलातर मग जाणून घेऊया मंगळवारी करावयाच्या उपायांबाबत माहिती.
करा हे उपाय
- -मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी हनुमानजींची पूजा करावी. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. त्यायामुळे या वेळेत हनुमानजींची पूजा केली पाहिजे.
- – मंगळवारी उपवास करत गरजूंना अन्नदान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
- -मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त मानले जाते. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
- -जीवनातील सुख-शांतीसाठी हनुमान मंदिरात गुड आणि हरभराचा प्रसाद अर्पण करावा. असे केल्याने हनुमानजींची कृपा लाभते.
- -जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून भगवान हनुमान यांच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने लाभ मिळतो.
- – मंगळवारी बजरंगबलीला भगवा चोला चढवावा. यासह सुंदर कांड, राम रक्षा स्तोत्रचे पठाण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा प्राप्त होते.
- – आर्थिक समस्येवर मात करण्याठी मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा.
- – नोकरीबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला चढवावा. या उपायामुळे नोकरी मिळवताना येत असलेल्या अडचणी दूर होतील
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)