Apple Side Effects: आरोग्याच्या दृष्टीने फळं फायदेशीर ठरतात. त्यामुळे डॉक्टर देखील निरोगी राहण्यासाठी रुग्णांना फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यात सफरचंदाचे (Apple) अनेक आरोग्यदायी फायदे असल्याने सफरचंदला पहिली पसंती मिळते. मात्र, तुम्हाला माहित आहे का, सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला नुकसान देखील होवू शकते. हे ऐकूण आश्चर्य वाटलं ना? पण, हे खरं आहे. आजचा आमचा हा लेख त्याच विषयावर आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सफरचंदाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला काय नुकसान होतं याविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहीती.
अॅलर्जी
सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे अतिसेवन करू नका. सफरचंदाचे ज्याप्रमाणे फायदे आहे त्याच प्रमाणे काही तोटे देखील आहे. सफरचंदाच्या जास्त सेवनाने पोटाचा त्रास होऊ शकतो. यात पोटदुखी, पोटात मुरड येणे आदी समास्या निर्माण होतात. काही लोकांना सफरचंद खाल्ल्याने अॅलर्जीही होत हात-पाय आणि संपूर्ण शरीरावर खाज सुटते. तसेच सफरचंदसह त्याच्या बिया खाणे देखील आरोग्यला घातक ठरते. त्यामुळे दिवसातून एकच सफरचंद खाणे आरोग्यासाठी योग्य आहे.
लूज मोशन
सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल वाढते. त्यामुळे सफरचंदाच्या अतिसेवनामुळे आहारातील उच्च फायबर पचवता येत नाही आणि व्यक्तीला लूज मोशनचा त्रास होतो. त्यामुळे सफरचंदाचे अतिसेवन टाळले पाहिजे.
चरबी वाढते
सफरचंदात कार्बोहायड्रेट आणि फायबर आढळतात. एका लहान सफरचंदमध्ये 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 5 ग्रॅम फायबर असते. यामुळे चरबी वाढते. त्यामुळे दिवसातून एक पेक्षा जास्त सफरचंद खाणे टाळावे. असे केल्यास तुम्हाला शरीरात चरबी वाढण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)