Shah Rukh Khan: सुपरस्टार शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. सध्या तो पठाण (Pathaan) चित्रपटाच्या यशाने खूपच चर्चेत आहे. पठाणच्या निमित्ताने तब्बल ४ वर्षांनी शाहरुखचे मठ्या पडद्यावर आगमन झाले आहे. शाहरुखने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, तो खरोखरचं बॉलिवूडचा बादसशाह आहे. शाहरुख खानचा कितीही दिवसांनी पडद्यावर आला तरी त्याची जादू कायम असते. पठाण देशभरात सुपरहीट ठरला आहे. परदेशातही बंपर कमाई सुरू आहे. एकूणच किंग खानचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. अशातच शाहरुखशी संबंधित किस्से आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सांगत आहे की, एकदा एका गार्डने त्याला त्याच्याच चित्रपटाच्या मुहूर्तावर जाण्यापासून कसे रोखले.

गार्ड जेव्हा धक्का मारत म्हणाला…
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान एक मुलाखत देत आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या सोबत घडलेला एका अतिशय रंजक किस्सा सांगितला. तो सांगतो की, शिखर चित्रपटाच्या मुहूर्तावर तो दिल्लीत होता. र्यक्रमाला पोहोचला तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या गार्डने त्याला अडवले. शाहरुख म्हणाला की, मी त्याला मी शाहरुख आहे, या चित्रपटाचा हिरो. त्यावर गार्ड म्हणाला, “चल बहुत देखे तेरे जैसे हीरे-मोती. चुपचाप बैठ इधर ही”. त्यावर शाहरुखने सांगितले, मी पुन्हा त्या गार्डला बोललो, “मी खरं सांगतोय. मला स्टेजवर जायचं आहे. सगळे माझी वाट पाहत आहेत”. यावरही गार्ड सहमत झाला नाही आणि धक्का मारत म्हणाला, काढा याला इथून.
यानंतर, काही लोकांनी मला ओळखले आणि तो या चित्रपटाचा नायक शाहरुख खान असल्याचे सांगू लागले. तरीही गार्ड म्हणाला, “अरे ये कैसा हीरो है. पर्सनालिटी तो लगती नहीं हीरो वाली”. या व्हिडिओमध्ये हा किस्सा सांगताना शाहरुख खानची एक्स्प्रेशनही पाहण्यासारखी आहे. चाहत्यांना किंग खानचा हा व्हिडीओ खूप आवडला असून हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. सुभाष घई 1997 मध्ये शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि ऐश्वर्या राय यांना घेऊन शिखर नावाचा चित्रपट बनवणार होते, पण नंतर त्यांनी हा प्रकल्प रद्द केला.