Tongue Disease: मानवी शरीरातील महत्त्वाच्या जज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे जीभ (Tongue). पदार्थाची चव जाणण्यापासून ते बोलण्याच्या प्रक्रियेत जीभ महत्त्वाची ठरते. त्यामुळे जिभेच्या आरोग्याकडे (Tongue Health Tips) लक्ष दिले पाहीजे. अनेकदा जिभेवर पांढरा थर साचतो. हे आरोग्यासाठी चांगले नाही. तुमच्याही जिभेवर पांढरा थर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला जिभेवर आलेला पांढरा थर दूर करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी जिभेवरील पांढरा थर दूर करु शकता.
जिभेवरील पांढरा थर दूर करण्याआधी ही समस्या का निर्माण होते. आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे. लोक दातांची काळजी घेता मात्र, संपूर्ण तोंडाची आणि जिभेची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे जिभेवर पांढरा थर निर्माण होतो. जिभेवरील पांढऱ्या थरामुळे तोंडाचा वास येणे, दात किडणे, पचनक्रिया खराब होणे, फंगल इंफेक्शन सारख्या समस्या निर्माण होतात.
मीठ
जिभेवरील पांढरा थर दूर करण्यासाठी तसेच जीभ स्वच्छ करण्यासाठी मिठाचा वापर करू शकता. यासाठी जिभेवर मीठ टाका त्यानंतर एका टूथब्रशने जीभ स्वच्छ करा. शेवटी गरम पाण्याने गुळण्या करा. आठवड्यातून 4 वेळा हा उपाय केल्याने चांगला परिणाम मिळतो.
हळद
आयुर्वेदात हळदीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहे. जिभेच्या स्वच्छतेसाठी हळद पावडर फायदेशीर ठरते. जिभेवर हळद पावडर टाका आणि ब्रशने स्क्रब करा. असे केल्याने जिभेवरील पांढरा थर कमी होत दुर्गंधीपासून देखील सुटका होईल.
नारळाचे तेल
नारळाचे तेल आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. नारळाचे तेल जीभ साफ करण्यासाठी फायद्याचे ठरते. नारळाच्या तेलात अँटीसेप्टिक गुण असतात. नारळाच्या तेलाने दररोज गुळण्या केल्याने तोंडातील जंतू नष्ट होतात.
लसूण
जिभेच्या स्वच्छेतेसाठी लसूण हा फायदेशार घरगुती उपाय आहे. दररोज 2 ते 3 कच्चे लसूण खाल्ल्याने जिभेवरील पांढरा थर दूर होतो. लसूणमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहे. ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होते.
कोरफड जेल
कोरफड केस, त्वचा, यासह शरीरातील घाण काढण्यास उपायुक्त ठरते. जीभ साफ करण्यासाठी कोरफड जेलचा वापर फायदेशीर ठरतं. यासाठी जिभेवर कोरफड जेल लावून स्क्रब करा.
दही
जिभेवर साचलेला पांढरा थर, फंगस आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरतं. दह्यामध्ये प्रो-बायोटिक गुणधर्म असतात. जे जिभेवरील थर काढण्यास मदत करता. जिभेवरील पांढरा थर काढण्यासाठी जिभेवर दही ठेवा आणि स्क्रब करा. त्यानंतर ब्रशने हा थर काढत पाण्याच्या गुळण्या करा.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत असून muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)