Kangana Ranaut : कंगना रणौतचा बॉलिवूडला इशारा, बघा काय म्हणाली…

kangan ranaut

Kangana Ranaut : रिलीज होण्याआधीच वादात सापडलेला ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास 167 कोटींची कमाई (Pathaan Box Office Collection) केली आहे. ‘पठाण’च्या या यशानंतर सोशल मीडियावर शाहरुख खानवर (Shahukh Khan) अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच कंगनाने चित्रपटात पाकिस्तानला चांगल दाखवल्याचा विरोध करत आहे. ‘पठाण’वर निशाणा साधल्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतने ‘द्वेषावर विजय’ म्हणणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यानुसार जाणून घेवूया नेमकं काय आहे प्रकरण.

[metaslider id="6181"]

बॉलिवूड मेगा स्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ नुकताच रिलीच झाला आहे. या चित्रपटाने कमाईच्याबाबतीत अनेक रेकॉर्ड तोडले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास 167 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘पठाण’च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि चित्रपट निर्माता करण जोहरने आनंद व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने ‘प्रेम नेहमीच जिंकतो’ अशी कमेंट लिहिली होती. तर करण जोहरने पोस्टमध्ये ‘द्वेषावर विजय’ असे म्हटले आहे. यामुळे कंगना आणि बॉलिवूड असा वाद निर्माण झाला आहे.

कंगनाने दिला इशारा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि चित्रपट निर्माता करण जोहरच्या पोस्टनंतर कंगना रणौतने शनिवारी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, “बॉलिवूडवाल्यांनो, तुम्ही देशात हिंदू द्वेषाने त्रस्त आहात, अस दाखवण्याचा प्रयत्न करू नका, जर मी ‘द्वेषावर विजय’ हे शब्द पुन्हा ऐकले, तर तुमचाह तोच क्लास होईल जो काल होता. तुमच्या यशाचा आनंद घ्या, चांगले काम करा आणि राजकारणापासून दूर राहा.

यूजर्सनी फटकारले

कंगनाच्या या ट्विटला रिप्लाय देताना काहींनी तीला फटकारले. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले की, “चला पठाण बाजूला करूया…’नफरत पे जीत’चं एक उदाहरण म्हणजे, तुमचे शेवटचे नऊ चित्रपट एकामागून एक कसे फ्लॉप झाले? प्रेक्षकांनी कंगनाला नाकारले, आम्हाला माहित आहे की, आता तुम्ही स्मृती इराणी जिथे आहे तिथं जायला उत्सुक आहात, दुसर्‍या यूजरने ट्विट केले की, “मॅडम जी, तुम्ही कुठून आहात? बॉलीवूड नाही का? वेगळ्या इंडस्ट्रीतून आहात का?” असे म्हणत अनेकांना कंगनाला फटकारले.

error: Content is protected !!