Dipika Chikhlia Topiwala: रामानंद सागर यांच्या टीव्ही शो रामायणमधून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री दीपिका चिखलियाला (Dipika Chikhlia) सध्या ट्रोल होताना दिसत आहे. रामायण या शोमध्ये दीपिकाने सीतेची भूमिका साकारली होती. शोमधील अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रेक्षक इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी तिला सीता मानून पूजा करण्यास सुरुवात केली. पण अलीकडेच दीपिका एक व्हिडिओ अपलोड करून काही चाहत्यांच्या रोशाला जात आहे. जणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.
खरं तर या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मॉडर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्री तिच्या व्हिडीओमध्ये तिचा ड्रेस फ्लॉंट करताना दिसत आहे. दीपिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्स तिची प्रशंसा करत आहेत, तर काही युजर्सही तिला ट्रोल करत तिच्यावर निशाना साधला आहे.
View this post on Instagram
दीपिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘ना ये कोई सीता माँ है ना हो सकती है’. तर एका युजरने अभिनेत्रीच्या व्हिडिओला ‘हास्यास्पद’ म्हणत त्याचा निषेध केला. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, रामायण मालिकेतील सीता म्हणून तिची प्रतिष्ठा लक्षात घेऊन दीपिकाने असे व्हिडिओ शेअर करू नयेत. या युजरने पुढे कमेंट केली की, असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिलांना समाजात आदर नाही. इतर अनेकांनीही दीपिकाला पाश्चात्य कपडे घालून सीतेची प्रतिमा खराब करू नये असा सल्ला देत ट्रोल केले आहे.
तर काही यूजर्स म्हणाले की, रील आणि वास्तविक जीवनात फरक आहे. यूजर्सनी आपली घाणेरडी मानसिकता बदलावी, असे एका चाहत्याने म्हटले आहे. इतरांनीही या व्हिडिओसाठी दीपिकाचे कौतुक केले.