आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभे राहावे- मनोज जरांगे पाटील
खानदेशातील अनेक मराठा बांधवांना आरक्षण आहे परंतु आम्हाला आरक्षण नाही त्यामुळे मराठा जात संकटात आलेली असून मराठा समाजाचे मुले संकटात आलेली आहेत हीच योग्य वेळ आहे आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला येण्याची हेच आवाहन आणि विनंती करण्यासाठी इथपर्यंत आल्याचे व तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे हीच योग्य वेळ आहे पाठबळ द्या असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुक्ताईनगर येथे केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे यात कुठलीही शंका ठेवू नका कारण सरकारने तसा शब्द घेऊन त्या संदर्भात आश्वासनही दिलेले आहे आणि आपणही वेळ दिलेला आहे सध्या फक्त खानदेश आणि विदर्भातील मराठ्यांच्या पाठबळाची गरज आहे .त्या नेत्याचे ऐकून एकट्या मराठ्यांचे नुकसान होणार असेल तर मराठा कोणत्याही थराला जाऊ शकतो असा भुजबळांचे नाव न घेता त्यांनी इशारा सरकारला दिला आहे व तो येवल्याचा येडपट आडवा येतोय व ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय जातीय दंगली घडवण्याचा उद्देशाने वक्तव्य करीत आहे त्यामुळे मराठा समाजाला विनंती आहे की त्याच्या वक्तव्याला ऐकून कुठेही जातीय ते निर्माण झाली नाही पाहिजे तो राजकीय फायद्यासाठी काहीही बोलेल पण आपण ओबीसींना मराठ्यांच्या अंगावर आणि मराठ्यांना ओबीसींच्या अंगावर अजिबात जायचे नाही आपण गुण्यागोविंदाने रहायचे व आपण शांततेत मराठा आरक्षणाच्या मागणीला लावून धरायचे आहे असेही आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाज व ओबीसी समाजाला केलेले आहे.
मनोग जरांगेंचे जंगी स्वागत*
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे मुक्ताईनगरात सर्व मराठा समाजबांधवांनी अतिशय जोरदार स्वागत केले. दोन क्रेन द्वारे सुमारे एक टन पुष्पहारांनी स्वागत तर सुमारे 51 जे सी बी द्वारे पुष्पवृष्टी करून करून जोरदार स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रवर्तन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे यांनी सकाळ पासून जमलेल्या हजारो मराठा समाज बांधवांना संबोधित केले.
सभेनंतर प्रवर्तन चौक ते संत मुक्ताई नवीन मंदिर अशी भव्य मिरवणूक
सभेनंतर प्रवर्तन चौक ते संत मुक्ताई नवीन मंदिरा पर्यंत मनोज जरांगे यांची भव्य मिरवणूक शहरातून निघाली , एक मराठा लाख मराठा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. तर संत मुक्ताई मंदिरात आदिशक्ती मुक्ताई साहेंबाचा आशीर्वाद घेवून जरांगे पुढें मलकापूर कडे मार्गस्थ झाले.