धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ll संत भेटीने मुक्ताईनगरी भक्तीरसात न्हाली संत नामदेव रथ व सायकल यात्रेचे मुक्ताईनगर मध्ये स्वागत

20230902_093459

धन्य काळ संत भेटी । पायीं मिठी पडिली तो ll
संत भेटीने मुक्ताईनगरी भक्तीरसात न्हाली
संत नामदेव रथ व सायकल यात्रेचे मुक्ताईनगर मध्ये स्वागत

[metaslider id="6181"]

मुक्ताईनगर दि . २७ –

धन्य काळ संत भेटी l पायी मिठी पडली तो ll
संदेहाची सुटली गांठी । झालो पोटीं शीतळ ॥

संतांच्या चरणांशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय. त्यांच्या भेटीमुळे संशयाच्या सर्व गाठी सुटून जातात. त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते. संतांच्या कृपाप्रसादाने भवनदीच नौका बनते आणि पैलीतीरी किनाऱ्यावर उतरविते. जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाप्रमाणे आज ( सोमवार ) संतनगरी मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई व संत नामदेव भेटीचा सोहळा रंगला . या संत भेटीने मुक्ताईनगरी भक्तीरसात न्हाऊन गेली .


भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान ( पंजाब ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली आहे . शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत . या यात्रेने २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान ठेवले .
शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाल
भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशा सुमारे २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे सोमवारी विठ्ठल नामाच्या जयघोषात जळगांव जिल्ह्यात पहूर येथे आगमन झाले . पहूर – पाळधी परिसरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संत नामदेव रथ व सायकल यात्रेचे स्वागत केले .
भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान ( पंजाब ) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली आहे . शांती, समता, बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत . या यात्रेने २३ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथून प्रस्थान ठेवले .आज या यात्रेचे रिमझिम पावसात भाविकांनी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत केले . संत मुक्ताई संस्थानच्या वतीने अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी रथ व सायकल यात्रेचे स्वागत करुन पादुकांची पूजा व आरती केली .

यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे , ज्ञानेश्वर हरणे , भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उपाध्यक्ष शंकर टेमघरे , सचिव ॲड विलास काटे , खजिनदार मनोज मांढरे , विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे , सुभाष भांबुरे , राजेन्द्र मारणे , विठ्ठल शिंदे यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते . आज ही यात्रा पहूर , जामनेर , बोधवड मार्गे मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचली .

*पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत*
या यात्रेचे चंदिगड येथे पंजाबचे राज्यपाल राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे सोहळ्याचे स्वागत करतील . संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे ही रथ व सायकल यात्रा पोचणार आहे.

error: Content is protected !!