उचंदा उपसरपंच पदी सौ सविता इंगळे यांची निवड
उचंदा ता. मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आज झालेल्या निवडी प्रसंगी सविता भागवत इंगळे यांनी व गणेश मधुकर पाटील यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले होते निवडी प्रसंगी दोघांनाही प्रत्येकी सहा सहा मते पडली मात्र सरपंचांना एक अतिरिक्त मतदान देण्याचा अधिकार असल्याने त्यांनी आपले मत सविता इंगळे यांच्या पारड्यात टाकले त्यामुळे उपसरपंच पदी सविता भागवत इंगळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच वंदना भोलाणे , सदस्य सुनील धनगर पंचफुलाबाई बेलदारबसंताबाई हिवरे,प्रतिज्ञा इंगळे, प्रकाश पाटील, वैशाली पाटील, शोभा भोलाणे ,किरण तायडे, गणेश पाटील,सविता धनके आदी सदस्य उपस्थित होते . निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एकनाथ कोळी यांनी निवडीचे कामकाज पुर्ण केले त्यांना हर्षल पाटील यांनी सहकार्य केले उपसरपंच पदी निवड झालेल्या सविता इंगळे ह्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कट्टर समर्थक आहे यावेळी सरपंच पती दीपक महाराज भोलाणे, अरुण पाटील ,शांताराम पाटील, योगेश पाटील,अशोक पाटील ,विजय पाटील ,दिपक इंगळे, संतोष भोलाणे, संदीप पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, संदीप इंगळे,शांताराम इंगळे, भागवत इंगळे ,रामदास भोलाणे ,निवृत्ती पाटील, धोंडू पाटील ,देवानंद पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सविता इंगळे यांचे हार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.