पुणे, 3 मार्च : स्वारगेट एसटी स्थानकात शिवाशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडेने बलात्कार केला होता. पसार झालेल्या गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतले.
गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. गाडे वापरत असलेला मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली.