Immunity Boost In Winter: जवळपास सर्वांना हिवाळा (Winter Tips) ऋतू आवडतो. हिवाळ्यातील आल्हाददायक गुलाबी थंडी प्रत्येकाला हवी असते. मात्र, या गुलाबी थंडीसह या ऋतूत आजारांचा धोकाही वाढतो. राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. संसर्ग झपाट्यानं वाढत सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या निर्माण होत आहे. या परिस्थितीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती रोगांशी लढण्यास मदत करते आणि आपण निरोगी राहतो. त्यामुळे हिवाळ्यात आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही ( Winter Health Tips) टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती.
सामान्यतः हिवाळा आला की बहुतेक लोक आरोग्याविषयी जागरूक होत व्यायामाकडे लक्ष केंद्रित करतात. मात्र, फक्त व्यायाम करून शरीर निरोगी ठेवता येणार नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आयुर्वेदानुसार, आहारासंबंधी अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकतो.
हळद
हळद अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक असतात. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.
आवळा
आयुर्वेदानुसार, आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. आवळ्याच्या सेवनाने झपाट्याने प्रतिकारशक्ती वाढते. तसेच मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि केस गळणे देखील कमी होते. हिवाळ्यात रोज 1 आवळ्याच्या मुरंब्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकते.
अंजीर आणि दूध
अंजीर पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिने, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात दुधासोबत याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वेगाने वाढते.
गुळाचा वापर
गुळात लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. गूळ आपल्या शरीराला उबदार ठेवतो. दररोज थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन केल्याने संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरणाची पातळी राखली जाते. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त गुळाचे सेवन केल्यास अतिसार किंवा नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो.
तुळशीचे पान
तुळस हे नैसर्गिक औषध म्हणूनही ओळखले जाते. तुळशीचा एकीकडे अनेक धार्मिक कार्यात वापर केला जातो, तर दुसरीकडे अनेक रोगांच्या उपचारासाठीही तुळशीचा उपयोग होतो. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती लगेच मजबूत होते. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने श्वसन प्रक्रियाही चांगली राहते आणि फुफ्फुस स्वच्छ होते.
च्यवनप्राश
च्यवनप्राश रक्त शुद्ध करते आणि ऋतूजन्य आजारांपासूनही संरक्षण करते. च्यवनप्राशमुळे स्मरणशक्ती वाढते, त्यामुळे आरोग्य तज्ज्ञही थंडीत च्यवनप्राश घालण्याचा सल्ला देतात.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)