Ghaziabad Murder Case: उत्तर प्रदेशातील (UP) गाझियाबाद (Ghaziabad) येथे हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराची निर्घृण हत्या करत त्याच्या शरीराचे 10 पेक्षा जास्त तुकडे केले. संशयिताने मृतदेहाचे तुकडे झुडपातून फेकले. पोलिसांनी हे तुकडे जप्त केले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपीलाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोन करून बोलवले अन् केला घात
हा खळबळजनक प्रकरण गाझियाबादमधील (Ghaziabad Murder Case) खोडा भागातील आहे. येथे 34 वर्षीय रिक्षाचालक मिहलाल याने पत्नीच्या 24 वर्षीय कथित प्रियकर अक्षयची हत्या केली. अक्षयच्या हत्येप्रकरणी मिहलालला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात डीसीपी दीक्षा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी मिहलालची मोठी मुलगी काही दिवसांपूर्वी आगीत भाजली होती. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची पत्नी पीडित मुलीची काळजी घेण्यात व्यस्त होती, तर त्याच्या घरी आणखी दोन मुली होत्या. 19 जानेवारी रोजी मुलांची काळजी घेण्याच्या बहाण्याने मिहलालने पत्नीला तिचा कथित प्रियकर अक्षयला घरी बोलावून घेतले. यानंतर त्याने अक्षयचा खून केला.
असा लागला तपास
डीसीपी दीक्षा शर्मा यांनी सांगितले की, शनिवारी खोडा पोलिस स्टेशन हद्दीतील हिंडन कालव्याजवळ रस्त्यावर एक मृतदेह (Ghaziabad Murder Case) आढळून आला. हा मृतदेह राजस्थानमधील कोटपुतली नगर येथील रहिवासी अक्षयचा (Akshay Murder Case) होते. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्री फीरवत याप्रकरणी मिहलाल नावाच्या रिक्षाचालकाला अटक केली आहे.
मृतदेहाचे केले 10 तुकडे
पोलिसांच्या चौकशीत मिहलालने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या पत्नीचे अक्षयसोबत अवैध संबंध असल्याचेही त्याने सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने त्याने अक्षयची हत्या केली. त्यानंतर अक्षयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे 10 हून अधिक तुकडे केले आणि 3 पोत्यात टाकल्यानंतर झुडपात फेकले.