Somvar Che Upay : भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणेच साधे-भोळे आहे. भगवान शंकर भक्तांच्या पूजेने लवकर प्रसन्न होतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजेची आवश्यकता नाही. सध्या जलाभिषेक केल्यावरही भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात. सोमवारचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तुमच्या जीवनात पैशाची समस्या किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर तुम्ही सोमवारी काही उपाय (Monday Remedy) केले पाहिजे. या उपायांनी भगवान शंकर प्रसन्न होत तुमच्या जीवनातील समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊया सोमवारच्या उपायांसंदर्भात माहिती.
करा हे उपाय
- पांढरे चंदन- सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावावे असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पांढरे चंदन तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोतराचे फुल अर्पण करा.
- पंचामृत अभिषेक- भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने वैवाहीक जीवनात सुख समृद्धी येते.
- डाळींबाचा रस- वारंवार धनहानी होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा. यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.
- रुद्राक्ष अर्पण करा- वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी-शंकराचे दर्शन घ्या. यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा.
- मंत्र जप करा- सोमवारी सायंकाळी शिव-पार्वतीची संयुक्त पूजा करून शिवलिंगावर जल अर्पण करून दिवा लावा. दरम्यान, ‘ओम पार्वतीपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करा, असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल.
- कुंडलीतील ग्रह दोष- सोमवारी शिव मंदिरात जात शिवलिंगवर कच्चे दूध अर्पण करावे. 5 ते 7 सोमवारपर्यंत हा उपाय करावा. यामुळे कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो अशी मान्यता आहे.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)