Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात (Indian Navy) शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत 70 पदांची भरतीप्रक्रया राबवण्यात येत आहे. या अंतर्गत SSC एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. शॉर्ट सर्विस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत माहिती तंत्रज्ञान (कार्यकारी शाखा) मधील विशेष नौदल अभिमुखता अभ्यासक्रमांतर्गत उमेदवारांची निवड केली जाईल. या पदासाठी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहती मिळवत अर्ज करू शकतात.
या पदांसाठी इच्छूक उमेदवार 21 जानेवारी 2023 पासून अर्ज करू शकतात. तर अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2023 आहे. भारतीय नौदलाच्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 70 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानुसार जाणून घेऊया अर्जाची पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील.
उमेदवाराकडे असावी ही पात्रता
भारतीय नौदलाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह 10 वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. यासोबतच बीएससी, एमएससी किंवा बीई किंवा बीटेक किंवा एमटेक किंवा कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, किंवा आयटी किंवा सॉफ्टवेअर सिस्टीम किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये एमसीए उत्तीर्ण असावा. यासह उमेदवाराचा जन्म 2 जुलै 1998 ते 1 जानेवारी 2004 दरम्यान असावा.
अशी आहे निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडप्रक्रीये दरम्यान, उमेदवारांचा अर्ज आणि गुणांसह शैक्षणिक पात्रते नुसार छाननी केली जाईल. उमेदवारांची गुणवत्ता यादी एसएसबी गुणांच्या आधारे तयार केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणीत तंदुरुस्त आढळलेल्या उमेदवारांची पोलिस पडताळणी केली जाईल. यानंतर, रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करत नियुक्ती दिली जाईल.