Friday, October 24, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Buzz Aldrin Marriage: ५४ वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल ठेवणारे अंतराळवीर वयाच्या ९३ व्या वर्षी चढले बोहल्यावर

Santosh Marathe by Santosh Marathe
January 21, 2023
in देश - विदेश
0
Buzz Aldrin Marriage: ५४ वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल ठेवणारे अंतराळवीर वयाच्या ९३ व्या वर्षी चढले बोहल्यावर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Buzz Aldrin Marriage: अपोलो-११ मोहिमेदरम्यान (apollo 11 mission) अमेरिकेने १९६९ साली तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले. या तिघांनी पहील्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले होते. त्यापैकी एक अंतराळवीर (astronaut) म्हणजे बझ ऑल्ड्रिन. ५४ वर्षांपुर्वी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या बझ ऑल्ड्रिन (buzz aldrin) यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी आपल्या वाढदिवशी आपल्या मैत्रिणीशी लग्न करुण सर्वांना अश्चर्यचकीत केलं आहे. आल्ड्रिनने त्याची पत्नी डॉ. एन्का फॉरसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहेत. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे एका छोट्या समारंभात दोघांच लग्न पार पडलं.

सोशल मीडियावर शेअर कालेल्या या पोस्टमध्ये माजी अंतराळवीर बझ ऑल्ड्रिन यांनी म्हटले आहे., ‘माझ्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, मी माझी प्रेयसी डॉ. एन्का फॉरसोबत लग्न केले आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्या समारंभात हे लग्न केले असून आम्ही पळून गेलेल्या तरुणांसारखे उत्साहित आहोत.

On my 93rd birthday & the day I will also be honored by Living Legends of Aviation I am pleased to announce that my longtime love Dr. Anca Faur & I have tied the knot.We were joined in holy matrimony in a small private ceremony in Los Angeles & are as excited as eloping teenagers pic.twitter.com/VwMP4W30Tn

— Dr. Buzz Aldrin (@TheRealBuzz) January 21, 2023

बझ ऑल्ड्रिनने पोस्ट शेअर केल्यापासून पोस्टला आतापर्यंत २२,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि जवळपास १.८ दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. तर अनेक वापरकर्त्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आणि गंमतीशीर कमेंट केले आहे. यात एकाने कमेंट करत म्हटले आहे की, तुम्ही दोघेही चंद्रावर आहात. दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘वाढदिवस आणि लग्नासाठी अनेक शुभेच्छा. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. नेहमीप्रमाणे, तुम्ही ते शैलीने केले. तर एकायूजरने लिहिले, ‘वाह! अभिनंदन कर्नल ऑल्ड्रिन! आयुष्य ९३ व्या वर्षी सुरू झाले, अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

बझ ऑल्ड्रिनचं हे तिसरं लग्न

तुम्हाला जाणून अश्चर्य वाटेल की, बझ ऑल्ड्रिनने तीन वेळा लग्न केले आहे आणि घटस्फोट घेतला आहे. अपोलो ११ मिशनच्या तीन सदस्यांच्या क्रूमधील तो एकमेव जिवंत सदस्य आहे. नील आर्मस्ट्राँग हे चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती होते. तर बझ ऑल्ड्रिन त्यांच्या नंतर १९ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते.

Tags: Buzz Aldrin BirthdayBuzz Aldrin MarriageMoonwalkeMoonwalke Buzz Aldrin Marriage
Previous Post

Goa News: मॉस्को-गोवा विमानाला बॉम्बची धमकी, उझबेकिस्तानात आपत्कालीन लँडिंग

Next Post

Indian Navy Recruitment 2023: नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत 70 पदांची भरती, असा करा अर्ज

Santosh Marathe

Santosh Marathe

Next Post
Indian Navy Recruitment 2023: नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत 70 पदांची भरती, असा करा अर्ज

Indian Navy Recruitment 2023: नौदलात शॉर्ट सर्विस कमिशन अंतर्गत 70 पदांची भरती, असा करा अर्ज

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group