Goa News: रशियाची (russia) राजधानी मॉस्को (moscow) येथून 240 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गोवा चार्टर्ड फ्लाइटवर शनिवारी पहाटे बॉम्बची धमकी मिळाली. त्यामुळे विमान उझबेकिस्तानकडे (Uzbekistan) वळवण्यात आले आहे. अशी माहीती पोलिसांनी दिली. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे विमान पहाटे 4 वाजून 15 मिनिटांनी दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमातळावर उतरणार होते. मात्र, अझूर एअर संचलित (Azure Air) ही फ्लाइट (AZV2463) भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी वळवण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना 12.30 वाजता विमानात बॉम्ब ठेवल्याबद्दल ई-मेल प्राप्त झाला, त्यानंतर उड्डाण वळवण्यात आले.
उझबेकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग
या प्रकारानंतर भारतीय दूतावास Azure Air फ्लाइट AZV2463 च्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची माहिती मिळताच विमानाने उझबेकिस्तानमध्ये आपत्कालीन लँडिंग केले होते. सध्या विमानाची तपासणी केली जात असून विमान कंपन्यांनी प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.
दाबोलीम विमानतळावर अलर्ट
धमकीच्या मेलनंतर दाबोलीम विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून गोवा पोलिसांनी क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी), दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि श्वान पथकाचे कर्मचारी तैनात केले आहेत, असे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी सांगितले.
An Azur Air chartered flight from Russia’s Perm International Airport to Goa received a security threat. Following this, the flight was diverted to Uzbekistan. A total of 238 passengers, including 2 infants, and 7 crew are onboard: Airport Sources pic.twitter.com/2JKe9bWeO8
— ANI (@ANI) January 21, 2023
गेल्या आठवड्यातही मिळाली होती धमकी
गेल्या आठवड्यात मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर मॉस्को-गोवा विमानाचे गुजरातमधील जामनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. आठवडा भरात दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने खळबळ खळबळ उडाल आहे.