Sunday Remedies: प्रत्येक व्यक्ती सुख-सुविधा युक्त जीवन जगण्यासाठी कष्ट करतो. यात काहींना सहज यश मिळते तर काहींना मेहनत करूनही यश येत नाही. जीवनात यशस्वी होत आर्थिक संपन्नतेसाठी ज्योतिष शास्त्रात रविवार संबंधी काही उपाय (Jyotish Remedy) सांगितले आहे. रविवारी हे उपाय केल्यास सूर्य देवासह (Surya Dev) माता लक्ष्मी प्रसन्न होत आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असल्यास रविवारच्या दिवशी कोणते उपाय (Ravivar Che Upay) केले पाहीजे, जाणून घेवूया माहीती.
![Simply Easy Learning](https://i0.wp.com/muktaivarta.com/wp-content/uploads/2024/05/Blue-and-White-Modern-We-Are-Hiring-Flyer_20240518_215836_0000.jpg?resize=1600%2C1069)
रविवारी करा हे उपाय
- माता लक्ष्मीचा अशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेश द्वारात दोन्हीं बाजूला साजूक तुपाचा दिवा लावा.
- रविवारी ‘आदित्य हृदय स्त्रोत्र’ चा पाठ करावा. यामुळे भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत घरात समृद्धी येते.
- रविवारी मुंग्यांना साखर खाऊ घालावी. असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतात.
- रविवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावावा. असे केल्याने संपत्तीत वाढ होते. तसेच माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
- रविवारी तीन झाडू खरेदी करत, ते झाडू देवीच्या मंदिरात ठेवून द्यावे. दरम्यान, तुम्हाला कोणी बघणार नाही किंवा टोकणार नाही याची काळजी घ्या.
- रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी चंदनाचा तिलक लावावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा लाभते.
- रविवारी सायंकाळी आपली मनोकामना पिंपळाच्या पानावर लिहून हे पान नदीत प्रवाहित करावे.
- कामात अपयश येत असेल तर रविवारी रात्री झोपण्याआधी एक ग्लास गाईचे दूध उशीजवळ ठेवा. मग सकाळी पूजा केल्यानंतर ते दूध प्यावे.
- रविवारी माशांना पिठाचे गोळे बनवून खाऊ घाला. हा उपाय केल्याने घरात कधी धन-धान्याची कमी भासत नाही.
मान्यतेनुसार, रविवारी सायंकाळी शिव मंदिरात गौरी-शंकराची पूजा करत रुद्राक्ष अर्पण केला पाहिजे.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)