Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Distric) साकेगाव (ता. भुसावळ) येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठीकाणी सुरू असलेले बनावट नोटांच्या (Duplicate Currency) रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खर्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारी टोळी या ठकाणी कार्यरत होती. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. बनावट नोटाच्या या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहती अशी की, जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचे रॅकेट सुरू होतो. बनावट नोटांच रॅकेट चालवणारी ही टोळी खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलवून देत होती. त्यानुसार साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट सक्रीय असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात शन्नो या महिलेला अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या.
चौकशीसाठी अनेकांना घेतले ताब्यात
दरम्यान, एका महिलेला अतिशय गोपनीय पध्दतीत ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पहूर येथील हनीफ पटेल ( वय ५५) याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या रॅकेटचे पायमुळे कुठं पर्यंत आहे, याचा शोध घेण्याच्या दृष्टने पोलीस तपास करीत आहे.