Shanivar Vrat Katha: हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे विषेश महत्व आहे. त्यानुसार शनिवार हा भगवान शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला (Lord Shanidev) न्यायदेवता म्हटले जाते. व्याक्तिच्या कर्मानुसार शनिदेव फळ देत असतात. ज्या व्यक्तीवर शनीची कृपा असते त्याला जीवनात सुख आणि समृद्धी मिळते. तर दुसरीकडे शनिदेवाचा प्रकोप झाल्यास व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. शनिदेवाचा प्रकोप (Shani Dosh Upay) टाळायचा असेल तर शनिवारी व्रत (Shanivar Vrat Katha in maathi) आणि शनिदेवाची पूजा करावी. पूजेनंतर व्रत कथा वाचावी. त्यानुसार जाणून घेवूया काय आहे शनिवारची व्रत कथा.
अशी आहे शनिवार व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, ब्रह्मांडातील सर्व नऊ ग्रहांमध्ये वाद झाला होता आणि त्या सर्वांना त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे जाणून घ्यायचे होते, त्यासाठी सर्व ग्रह देवराज इंद्राकडे गेले. इंद्राने त्यांना राजा विक्रमादित्यकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर सर्व नवग्रह आपल्या समस्या घेऊन राजा विक्रमादित्यकडे गेले. राजा विक्रमादित्यला माहीत होते की, या नऊ ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहाला त्यांनी लहान म्हटल्यास त्याला राग येईल. पण, त्यांना हा प्रश्न सोडवत मार्ग काढायचा होता. त्यानुसार त्यांनी नव धातूपासून नऊ सिंहासने बनवली आणि प्रत्येक सिंहासनासमोर एक एक ग्रहाला उभे केले.
दरम्यान, राजा विक्रमादित्यने शनिदेवाला शेवटचे सिंहासन दिले, त्यामुळे शनिदेव क्रोधित झाले आणि ते निघून गेले. शनिदेवाच्या रागाचा प्रभाव हळूहळू वाढत. राजा विक्रमादित्यच्या कुंडलीत साडेसतीचा कोप वाढू लागला. एके दिवशी शनिदेव घोड्याचे व्यापारी बणून राजाकडे गेले आणि राजा विक्रमादित्यला अनेक घोड्यांमध्ये एक घोडा आवडला. त्या घोड्यावर बसताच घोडा राजा विक्रमादित्य यांना जंगलात घेऊन गेला. विक्रमादित्य जंगलात वाट चुकत एका नवीन देशात पोहचले. त्याठिकाणी राजाला एक व्यापारी भेटला राजाची भेट होताच त्या व्यापाराचा माल विकाला गेला. ज्यामुळे व्यापारी खूप खुश झाला. त्याने राजाला जेवायला नेले. व्यापाऱ्याच्या घरात एक खुंटी होती ज्यावर हार लटकलेला होता. राजाने पाहिले की खुंटी हार गिळत आहे. जेव्हा तो हार अचानक दिसेनासा झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने राजा विक्रमादित्यला त्याच्या राजाकडे घेऊन जात कैद केले.
त्या व्यापाऱ्याच्या राजाने राजा विक्रमादित्यला दोषी मनात त्यांचे हात कापले. त्यानंतर एका तेलीने राजा विक्रमादित्य यांना त्याच्या घरी नेले आणि काम दिले. हळूहळू साडेसात वर्षे पूर्ण झाली आणि शनीची महादशाही संपली. साडेसात वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजा विक्रमादित्यने एक राग गायला आणि त्यानंतर प्रभावित होऊन त्या राज्याच्या राजकन्येने विक्रमादित्य यांच्यासोबत लग्न करण्याचं व्रत घेतले. राजकन्येला खूप समजावले पण तिने कोणाचेच न ऐकता राजा विक्रमादित्यशी लग्न केले. एके दिवशी राजा विक्रमादित्य रात्री झोपला असताना शनिदेव त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. शनिदेव म्हणाले की, तुम्ही मला सर्वात लहान मानले होते, आता माझा ताप आणि क्रोध पाहा.
यानंतर राजा विक्रमादित्य यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी शनिदेवाची माफी मागितली आणि शनिदेवाने क्षमा देखील केले. सकाळपर्यंत सर्वांना राजा आणि शनिदेवाची माहिती झाली, त्यामुळे व्यापारी त्यांची माफी मागू लागला. व्यापाऱ्याने राजाला त्याच्या घरी परत येण्याचे आमंत्रण दिले. राजाने भोजन सुरू करतातच गहाळ झालेला हार बाहेर आला. त्यामुळे राजा विक्रमादित्याने चोरी केली नसल्याचे सर्वांना समजले. व्यापाऱ्याने आपल्या मुलीचे लग्न राजा विक्रमादित्यशी केले, त्यानंतर राजा विक्रमादित्य आपल्या दोन राण्यांसह उज्जैनला परतले.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)