Laal Rang 2 : अभिनेता रणदीप हुड्डाची (Randeep Hooda) अलीकडेच त्याची एक वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित झाली आहे. असे असले तरी तो बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून (Bollywood News) दूर आहे. मोठ्या पडद्यावर राधे (Radhe Movie) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. चाहत्यांना देखील त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. अशात रणदीपने शुक्रवारी त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. लाल रंग 2 हा त्याचा आगामी चित्रपट असून त्याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची माहीती दिली आहे.
त्यानुसार, लाल रंग नंतर लाल रंग 2 या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही तो दिसणार आहे. तो या चित्रपटाचा निर्माता देखील आहे.
लाल रंग 2 या चित्रपटाचे पोस्टर हिंदी आणि इंग्रजीमध्ये शेअर करत इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ये लो! हवा मे प्रणाम.. असे लिहिले आहे. लाल रंग 2 लवकरच शूट होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सय्यद अहमद अफजल यांनी केले. निर्मात्यांच्या यादीत प्रथम रणदीप हुडा फिल्म्स लिहिली, त्यानंतर पांचाली चक्रवर्ती, योगेश रहार, जेली बीन एंटरटेनमेंट आणि अवक फिल्म्स. यानंतर रणदीपने सह-निर्मात्यांची यादीही शेअर केली.
View this post on Instagram
लाल रंग चित्रपटाचा पहिला भाग हा हरियाणातील रक्तपेढ्यांमधून रक्त चोरीच्या कथेवर आधारित होता. या व्यवसायात गुंतलेल्या दोन मित्रांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग आता शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या भागात रणदीप हुडा, अक्षय ओबेरॉय आणि पिया बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. मात्र, दुसऱ्या भागासाठी रणदीपने अद्याप कलाकारांची माहिती दिलेली नाही.