Bollywood News: बॉलीवूडचे चाहते देशातच नाही तर संपुर्ण जगात आहे. सरत वर्ष बॉलीवूडसाठी (Bollywood) काही खास नव्हते. त्यामुळे सिनेनिर्मात्यांना 2023 पासून खूप आशा आहेत. या वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित (Upcoming Movie) होणार असून यातील काही चित्रपट मार्च 2023 च्या आधी रिलीज होण्यासाठी सज्ज झाले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करू शकतात. या वर्षात शाहरुख खान पठाण (Pathaan Movie) चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे, तर दुसरीकडे, इतर अनेक सेलिब्रिटींचे बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याआधी, मार्चपर्यंत कोणते 5 मोठे बॉलीवूड चित्रपट रिलीज होणार जाणून घेवूया माहीती.
शेहजादा (Shehzada)
दक्षिण भारतीय चित्रपट अला वैकुंठपुरमलोचा हिंदी रिमेक असलेला शहजादा हा चित्रपट 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. अला वैकुंठपुरमलोमध्ये अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. शहजादाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पुन्हा एकदा कार्तिक आणि क्रिती सेनॉनची जादू प्रेक्षकांवर चालेल अशी अपेक्षा आहे.
भोला (Bholaa)
अजय देवगणचा शेवटचा रिलीज झालेला ‘दृश्यम 2’ हिट ठरला आणि चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठीही प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे, याला वेळ लागेल. अशात अजय देवगणचा भोला हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. भोला हा तामिळ चित्रपट कैथीचा हिंदी रिमेक आहे. लोकेश नागराज दिग्दर्शित कैथीमध्ये अभिनेता कार्तीने दमदार भूमिका साकारली होती. भोलामध्ये अजय देवगणसोबत तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 30 मार्चला रिलीज होणार आहे.
तू झुठी में मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar)
रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. तेव्हापासून चाहते रणबीरच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. तू झुठी मै मक्कार हा रणबीरचा आगामी चित्रपट असून ज्यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट लव रंजन यांनी दिग्दर्शित केला असून 8 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
सेल्फी (Selfiee)
अक्षय कुमार आगामी चित्रपटाचे नाव सेल्फी आहे. सेल्फी हा मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अक्षयसोबत इमरान हाश्मी दिसणार आहे. 24 फेब्रुवारीला सेल्फी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अक्षयचे शेवटचे काही रिलीज झालेले चित्रपट फ्लॉप ठरले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
पठाण (Pathaan)
गेल्या चार वर्षापासून शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसला नाही. पठान चित्रपटाच्या माध्यमातून तो मोठ्या पडद्यावर परतत असून प्रेक्षकांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. आगाऊ बुकिंगमध्येच या चित्रपटाने अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. एकीकडे चित्रपटाबाबत उत्सुकता असतानाच दुसरीकडे वादही पाहायला मिळत आहे. पठाण 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.