Benefits of Orange: हिवाळ्यात आरोग्यविषयक काही समस्या निर्माण होतात. अशात आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहीजे. हिवाळ्यात संत्रीचे सेवन फायदेशीर ठरते. संत्री हे असे फळ आहे ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा (Orange Benefits) होतो. चवीला आंबट-गोड असलेली संत्री (Orange Health Benefits) आरोग्याला लाभदायी ठरते. विशेषतः हिवाळ्यात (Winter Health Tips) रोज संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेवूया संत्रीच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांविषयी अधिक माहती.
हिवाळ्यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील संत्री प्रभावी ठरते.
त्वचा होते चमकदार
संत्री अनेक औषधी गुणधर्माने संपन्न आहे. त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास संत्री फायदेशीर ठरत यामुळे वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही. सुरकुत्या, बारीक रेषा आदी समस्या कमी होत ग्लोईंग त्वचा मिळते. दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचेवर जी चमक येते ती कोणत्याही सौंदर्य उत्पादनातून मिळू शकत नाही.
डोळ्यांना होतो लाभ
डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील संत्रीचे सेवन फायदेशीर ठरते. जर तुम्हाला डोळ्यांसंदर्भात काही तक्रारी असतील तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावा. संत्र्याच्या नियमित सेवनाने तुम्हाला लाभ होईल.
पचनशक्ती मजबूत होते
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पाचनक्रिया महत्वाची ठरते. हिवाळ्यात रोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते. संत्र्यामध्ये विरघळणारे फायबर जास्त प्रमाणात असल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. भूक कमी लागल्याने वजन नियंत्रणात राहते. यासह संत्र्याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज देखील कमी होतात.
किडनी स्टोनच्या समस्येत मिळतो आराम
लघवीमध्ये सायट्रिक अॅसिडच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. संत्र्याचे सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते. सायट्रिक अॅसिड हे सामान्यतः आंबट फळांमध्ये आढळते जसे की संत्रा, लिंबू आदी. ज्या रुग्णांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी नियमित एक ग्लास संत्र्याचा रस प्यावा. यामुळे लघवीत सायट्रिक अॅसिडचे प्रमाण वाढत किडनी स्टोनची समस्या कमी होते.
(टीप : आरोग्याविषयी दिलेला हा लेख सामान्य माहीतीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)