Newzeland News- न्यूझीलंडमध्ये (Newzeland) सध्या राजकीय हलचालिंना वेग आला आहे. अशात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न (Newzeland PM Jacinda Ardren) या पुढील महिन्यात पदाचा राजीनामा देणार आहेत. या बाबत त्यांनी गुरुवारी आपल्या पक्ष सदस्यांच्या बैठकीत घोषणा केली. आर्डर्न या 2017 मध्ये पंतप्रधान (PM Jacinda Ardren)  झाल्या. त्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांनी सेंटर-लेफ्ट लेबर पार्टीचे नेतृत्व केले. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची आणि वैयक्तिक लोकप्रियतेत घट झाल्याचे दिसून आले आहे.
मीडीया रीपोर्ट्स नुसार, संसदेच्या सुट्टीतून परतल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात, लेबरच्या वार्षिक कॉकस रिट्रीटला सांगितले की, ब्रेक दरम्यान वाटले होते की, मला नेता म्हणून पुढे जाण्याची उर्जा मिळेल, परंतु तसे करण्यास मी सक्षम नाही . आर्डर्न पुढे म्हणाल्या की, पुढील सार्वत्रिक निवडणूक 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि तोपर्यंत मी खासदार म्हणून राहील, असे म्हणत आम्ही पुढची निवडणूक जिंकू आसा विश्वास  व्यक्त केला.
राजीनामा 7 फेब्रुवारीपूर्वी मंजूर होईल
आर्डर्न यांनी सांगितले की, त्यांचा राजीनामा 7 फेब्रुवारीपूर्वी मंजूर होईल. त्यानुसार नवीन नेता निवडण्यासाठी लेबर कॉकस 22 जानेवारी रोजी मतदान करेल. आर्डर्न म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्यामागे कोणतेही रहस्य नाही. मी माणूस आहे. आम्ही जेवढे देऊ शकतो तेवढे देतो. मी राजीनामा देत आहे कारण, अशा विशेषाधिकाराच्या नोकरीसोबत एक मोठी जबाबदारी येते. नेतृत्व करण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती कधी आहात आणि तुम्ही कधी नसता हे देखील जाणून घेणे महत्वाचे असते असे त्या म्हणाल्या. तर उपपंतप्रधान ग्रँट रॉबर्टसन म्हणाले की, या निवड प्रक्रीयेत त्यांचे नाव पुढे करणार नाहीत. दरम्यान जॅसिंडा आर्डर्न यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर न्यूझीलंडच्या राजकारणात राजकीय हलचालिंना वेग आला आहे.
 
	    	














