• वृक्षवल्ली आम्हा सोयरे ! स्तुत्य उपक्रम
• मुख्याधिकारी यांनी केले मुलगा चि.राघव याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण…!!
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती अश्विनी गायकवाड – भोसले यांचा मुलगा चि.राघव चंद्रकांत भोसले या बाळाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त त्यांनी शहरातील प्रभाग क्र.१३ मध्ये व विवीध ठिकाणी खुल्या भूखंडांवर स्वखर्चातून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष हे ऑक्सिजन व निसर्गाचा पर्यावरणाचा ऋतू काळांचा समतोल राखते तसेच सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करण्यात आले.त्यांनी तोतापुरी अंबा(१५), नारळ(५), केशर अंबा (१५),आवळा (१०),जामुन (३०),कडुलिंब (१०), सीताफळ (५), सयतुल(१०) असे एकूण १०० वृक्ष लागवड त्यांनी केली.
प्रसंगी उप नगराध्यक्षा मनीषा पाटील, सार्वजनिक बांधकाम सभापती तथा नगरसेवक संतोष मराठे, पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, गटनेते निलेश शिरसाट, अनिल पाटील , नुर मोहम्मद खान, युनूस खान, प्रवीण पाटील यांच्यासह पालिकेचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता राहुल मापारी, लेखापाल श्रीपाद मोरे, कर निरीक्षक अच्युत निल, कर्मचारी सचिन काठोके, संजू सोनार, सुनील बोराखेडे , निलेश डवले, सैतवाल , संजू नानोटे, सागर पूनासे, गोपाल लोहरे इतर असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
**************************
माझी वसुंधरा अंतर्गत मुक्ताईनगर शहरात उत्कृष्ट रित्या काम करून मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी शासन दरबारी पुरस्कार मिळवून ७५ लक्ष रू. ची पुरस्काराची रक्कम मिळवून मुक्ताईनगर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आज याच मुख्याधिकारी यांचेकडून स्वतः च्या मुलाच्या वाढदिवसावर वायफळ खर्च न करता त्यांनी स्वखर्चातून वृक्षारोपण केल्याने या स्तुत्य उपक्रमातून त्यांनी एक चांगला निसर्ग संवर्धनाचा संदेश नागरिकांना दिला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.