मुक्ताईनगर : तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मुक्ताई सागर, हतनूर धरणातून सर्व दरवाजे उघडून गेल्या दोन ते दिवसांपासून लाखो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाची संततधार सुरू असल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने मुक्ताईनगर मतदार संघातील तापी काठचे रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपुर, निंभोरासिम, नांदुरखेडा, अजंदा,सांगवे,पातोंडी,पुनखेडा.बोहर्डे व मुक्ताईनगर तालुक्यातील इतर या गावांना संभाव्य फटका बसण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ ठोस उपाय योजना कराव्यात यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथून जळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचेशी चर्चा केली तसेच जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत व मुक्ताईनगर व रावेर तहसीलदार यांना सूचना केलेल्या असून मतदार संघातील तापी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.














