सुकळी येथील गोठे बांधकामाचे अनुदान मिळावे शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले निवेदन
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील शेतकरीवर्गामधून शासकीय अनुदान योजनेत पाळीव गुरांसाठी गोठा बांधकामे पात्र निकषाने केले. परंतु पंचायत समिती च्या भोंगळ कारभारामुळे अद्याप पावेतो अनुदान मिळालेले नाही. त्यातच सद्या शेतात कामगिरी सुरू असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत सापडलेला असून सर्व शेतकऱ्यांचे गोठा बांधकाम चे अनुदान तात्काळ मिळावे असे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांसमक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना भ्रमणध्वनी वरून सूचना करून तात्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे सांगितले.
यावेळी कल्पेश अजाबराव पाटील, बाजीराव अर्जुन सोनवणे, गजानन सोपान पाटील, राजेंद्र धनराज भोई, वासुदेव काशिनाथ नावकर, नितीन नाना पाटील, अमोल वासुदेव कोळी, तुषार उल्हास पाटील, पंढरी शाळिग्राम पाटील, नितीन जगन्नाथ पाटील, विकास प्रकाश पाटील विकास माधवचौधरी आदीसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.














