आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी, बोदवड व मुक्ताईनगर नगरपंचायतींसाठी ५ कोटी मंजूर !
राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले पाठपुराव्यामुळे बोदवड व मुक्ताईनगर नगरपंचायतींच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी शासन निर्णय क्रमांकः- नपरि-२०२३/प्र.क्र.८२८ (०३)/नवि-१६ (ई-६९९८९९) दिनांक :- २१ ऑगस्ट, २०२४ अन्वये सुमारे ५ कोटी रुपये मंजूर झाले असून बोदवड येथील बडगुजर समाज, हटकर समाज यांच्यासाठी मल्टी पर्पज सभागृहे तसेच मुस्लिम समाजातील युवकांच्या मागणीला प्राधान्य देवून व्यायाम शाळा यासाठी मंजुरी मिळाली असून मुक्ताईनगर येथील वंजारी समाज , ब्राम्हण समाज तसेच सोनार समाज आणि मेडिकल असोसिएशन साठी देखील भरीव निधी मंजूर झाल्याने आनंद व्यक्त केला जात असून सर्वांकडून मागणीला प्राधान्य देत न्याय दिल्याने आ.चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले जात आहे.
सोबतचे विवरणपत्र
(अ) बोदवड नगरपंचायत जि. जळगांव क्षेत्रातील कामे
१) बोदवड नगरपंचायत हद्दीत गट नं. १६५ मध्ये नगरपंचायतच्या खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे. (५० लक्ष)
२) बोदवड नगरपंचायत्त हद्दीत अल्पसंख्यांक वस्तीमध्ये नगरपंचायतची व्यायामशाळा बांधकाम करणे. (५० लक्ष)
३) बोदवड नगरपंचायत हद्दीत मध्ये गट क्र.७९९/३ पैकी या नगरपंचायतच्या खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे. (५० लक्ष)
(ब) मुक्ताईनगर नगरपरिषद जि. जळगांव क्षेत्रातील कामे
४) मुक्ताईनगर नगरपरिषद हद्दीमध्ये गट क्र.५१४ मध्ये नगरपरिषदेचे भगवान बाबा सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.(५० लक्ष)
५) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील विविध प्रभागांमध्ये गटार बांधकाम करणे.(७० लक्ष)
६) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपरिषदेच्या गट क्र.५५९ वर सांकृतिक सभागृह बांधकाम करणे.(५० लक्ष)
७) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्र क्र.६ मध्ये नगरपरिषदेचे मटन मार्केट बांधकाम करणे.(५० लक्ष)
८) मुक्ताईनगर नगरपंचायत हददीत गट क्र.५५७ मध्ये नगरपंचायत मालकीच्या जागेवर श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. (५० लक्ष)
९) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीमध्ये रामरोटी आश्रमाजवळ नगरपरिषदेचे सभागृह बांधकाम करणे (२० लक्ष)
१०) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीमध्ये प्रभाग क्र.१२ गट क्र.३८१/४ मधील नगरपरिषदेच्या खुल्या भूखंडावर योगा हॉल बांधकाम करणे. (४० लक्ष)
११) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपरिषदेच्या जय भवानी व्यायाम
शाळेचे नुतनीकरण करणे.(२० लक्ष)