सोशल मिडियात पोस्ट टाकल्याचा राग ?
जीवे मारण्याच्या धमकीवरून गुन्हा दाखल !
पहा बातमी, मुक्ताईनगरात गुंड कोण पाळतेय ?
राजकीय तरुणांची दिशा गुंडगिरी कडे वळतेय का ?
सोशल मीडियात पोस्ट टाकल्याचा रागातून, पूर्णा नदीत मारून फेकण्याची धमकी !
मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा युवक शहराध्यक्ष बबलू उर्फ लक्ष्मण रमेश सापधरे यांनी फिर्यादी विनोद दयाराम वानखेडे यांनी फेसबुक व पोस्ट व कमेंट केल्याच्या कारणावरुन त्याचा मोबाईल वरून फिर्यादीस फोन करुन, रिकामे काम करु नको नाहीतर, पाला बबलु सापधरेशी आहे. तुझे या गावातून येणे जाणे बंद करुन टाकेल, आमच्या तुकड्यावर पाळलेले तुम्ही कुत्रे ,तु माझ्या रडारवर आहे साला आमचा बाप भी अंगार होता… आणि आम्ही बी अंगार आहोत पुर्णा नदीत टाकुन देवू साल मुक्ताईनगरचे व्यापारी भी आम्ही आणि गुंडे भी आम्ही अशी धमकी दिली तसेच बबलु सापधरे याने सांगितल्या प्रमाणे काही दिवसापूर्वी एका नगरसेवकास देखील मारहाण केली असून कुठे लागतो असे धमकित घेण्याचा प्रयत्न करून त्याने स्वतः वर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगून तसेच याच कारणावरुन मला त्याचे सोबतचे ग्रुप मधील मोबाईल नंबर वरुन इतर लोकांनी देखील फोन करून शिविगाळ व जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहे. म्हणुन त्याचे खुनशी प्रवत्ती पासुन भविष्यात फिर्यादीच्या किंवा त्याच्या परिवाराचा घातपात होण्याची भिती आहे. वैगरे अशा फिर्यादीवरून बबलू सापधरे यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात अदखल पात्र गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार लिलाधर भोई हे करीत आहे.
तर व्हायरल call रेकॉर्डिंग वरून देखील आश्चर्य व्यक्त केली जात असून जनतेच्या मतांनी राजकीय करिअर करता करता लोक स्वतःला गुंड म्हणवून घेवून लोकांवर दहशत निर्माण करत असतील पोलीस प्रशासन झोपा काढतेय का असा सवाल उपस्थित होत आहे.
सल्ला “मुक्ताई वार्ता”चा बघा पटतोय का ?
तर तरुण राजकारण्यांनी, कोणत्याही भाऊ व ताईच्या आवेशात न येता गुंडगिरीचा मार्ग न पत्करता आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत वारकरी होऊन स्वतःच्या कुटुंबाची भक्तीची परंपरा आहे अशी शेखी मिरवावी, ना की गुंडगिरीची |
सल्ला “मुक्ताई वार्ता” चा सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना, कारण परिस्थिती बिकट येते तेव्हा ना कोणी राजकीय भाऊ , ना ताई कामात येईल…पण तुमच्या पासून चांगली मैत्रीची नाती मात्र माती मोल होईल …
सोबत संकट काळी सोबत असेल तर घरातील आई, बहीण आणि केवळ कुटुंब,त्या करिता कुटुंबासाठीच जागा रे मित्रांनो !