सामाजिक सभागृहासाठी भोई समाजाचे आमदारांना साकडे
*मुक्ताईनगर येथे लवकरच उभारणार भोई समाजासाठी सामाजिक सभागृह आमदार चंद्रकांत पाटील यांचे भोई समाजाला दिले आश्वासन*
*समाजाने मानले आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार*
मुक्ताईनगर तालुक्यातील भोई समाजासाठी सामाजिक सभागृहाची गरज लक्षात घेता समाज हिताच्या दृष्टिकोनातून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल व सामाजिक सभागृह उभारण्यात येईल असे आश्वासन मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी केले.*
*मुक्ताईनगर तालुक्यात भोई समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला अवस्थेत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून भोई समाजाच्या वतीने मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. समाजातर्फे आयोजित विविध सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र जागा व त्यावर अद्ययावत असे सभागृह असावे यासाठी मुक्ताईनगर तालुका भोई समाजातर्फे तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले.*
*याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तालुक्यातील बहुतांशी समाजाला सामाजिक सभागृह उपलब्ध करून दिले असून मतदारसंघातच नव्हे तर इतर मतदारसंघात देखील त्यांनी आपल्या या कार्याचा ठसा उमटवला असल्याचे याप्रसंगी आयोजित छोटेखानी सभाप्रसंगी समाज बांधवांनी मत व्यक्त केले.*
*भोई समाज हा डांगर मळे व चणे फुटाणे विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहे. अतिशय सर्वसामान्य गरीब व भटका समाज असल्याने या समाजाला तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक सभागृह असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना याप्रसंगी समाज बांधवांच्या वतीने मागणी करण्यात आले.*
*याप्रसंगी छोटेखाली सभेत भोई समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या व्यथा व मागण्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. जगन्नाथ चांगदेव कर गुरुजी रघुनाथ ढोले सर यांनी याप्रसंगी समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्याच्या मागण्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या.*
*प्रसंगी तालुका अध्यक्ष छोटू भाऊ भोई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की समाज हा अतिशय गरीब व हलाखीचे जीवन जगणारा असून सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून भोई समाजासाठी मुक्ताईनगर येथे सामाजिक सभागृह असणे आवश्यक आहे व आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील हे भोई समाजाला निराश करणार नाही व समाज देखील भाऊंना निराश करणार नाही असे आपल्या भाषणात सांगितले.*
*याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात तत्काळ सामाजिक सभागृहासाठी आपण पावले उचलत असून येत्या पंधरा दिवसात नगर विकास मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले. व नजिकच्या काळात लवकरात लवकर सामाजिक सभागृह कसे उभे राहील यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील असून भोई समाजाने आपल्याला या मागणीसाठी योग्य समजले त्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी समाजाचे देखील आभार मानले.*
*याप्रसंगी मोठ्या संख्येने मुक्ताईनगर कुऱ्हा, अंतुर्ली, चांगदेव परिसरातील भोई समाज बांधव उपस्थित होते.*
*याप्रसंगी तालुका अध्यक्ष छोटू बाबुराव भोई, जगन्नाथ चांगदेव कर गुरुजी, रघुनाथ काशीराम ढोले, नामदेव मिठाराम भोई,हरी भोई, रमेश सुपडू मोरे,विनायक नामदेव वाडेकर ,प्रवीण रमेश भोई, वसंता फकीरा भोई, जगन्नाथ शंकर भोई, शिवलाल लालचंद भोई, सोमा प्रकाश भोई, ब्रिजलाल बन्सी भोई, हिरालाल बुधाराम भोई, रवींद्र भोई, मारुती दशरथ भोई, संजय उखार्डू भोई, कांतीलाल देविदास भोई, मधुकर भोई, मनोज भागवत भोई, आकाश सुभाष भोई, गणेश रमेश बारिंगे, किशोर लक्ष्मण भोई, मयूर रतन भोई, सुमित संजय भोई, सोपान रामदास भोई, गोपाळ महादेव भोई, ज्ञानेश्वर सदू भोई, हिरामण मोतीराम भोई, राजेंद्र अंबादास भोई ,किशोर बनू भोई, रघुनाथ विठ्ठल भोई, अनिल बनू भोई, अरुण बनू भोई ,गणेश दशरथ भोई, समाधान नथू भोई, जितेंद्र कौतिक भोई, राजेंद्र धनराज भोई ,मधुकर रामकृष्ण म्हैसरे ,फकीरा भोई ,लक्ष्मण किटकुल भोई ,किशोर भिवा तायडे ,विजय बीसन भोई, भिवासान बिसन भोई,अनिल लक्ष्मण भोई, मधुकर रतनलाल भोई, किशोर शामराव भोई, किशोर महादेव मोरे, चेतन रवींद्र भोई, ज्ञानेश्वर लक्ष्मण भोई, विशाल गोपाळ भोई, संजय वसंता भोई, गजानन हिरालाल भोई ,संतोष रामभाऊ भोई, महादेव पांडुरंग भोई, उखर्डा भोई, मयूर रतन भोई ,धीरज सुरेश भोई, सुमित संजय भोई, शुभम प्रवीण भोई, हर्षल विजय भोई, कुणाल सोमलाल भोई, आकाश संजय भोई, आर्यन विनायक वाडेकर या भोई यांच्यासह मोठ्या संख्येने भोई समाज बांधव याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक वाडेकर यांनी मानले.*