आषाढ शुद्ध चतुर्दशी रोजी आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली कडून साडीचोळी अर्पण
श्री मुक्ताई आईसाहेबांचे बंधू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कडून दरवर्षी श्री आईसाहेबांना साडीचोळी अर्पण होत असते.
आज दि १९ जुलै २०२४ रोजी चतुर्दशीच्या दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची यांचेकडून पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. निरंजननाथ जी यांच्याकडून श्री संत आदिशक्ती मुक्ताईची महापुजा करण्यात आली व साडी चोळी अर्पण करण्यात आली.
यावेळी श्री मुक्ताई संस्थानचे विश्वस्त सम्राट पंजाबराव पाटील, शंकरराव पाटील, मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्रजी हरणे, ह.भ.प. भानुदास महाराज चातुर्मास्ये, उमेश बागडे, जोशी महाराज हे उपस्थित होते.
#mauli #muktabai #abhishek #pandharpur #wari #varkari
#आषाढी #आषाढीएकादशी #एकादशी #ekadashi #ashadhiekadashi