*आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणासाठी 55 कोटी 49 लक्ष रुपयांची कामे मंजूर*
मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्याची कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने शासन निर्णय क्रमांक :मु ग्रा यो – 2024/प्र. क्र.384/बांधकाम -4 शासन निर्णय काढण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुचवलेले व त्यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेले काँक्रिटच्या रस्त्यांची कामे आहे. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघात रस्ते विकासाच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. या मंजूर झालेल्या विकास कामांमुळे विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मुक्ताईनगर मतदारसंघातील मंजूर काँक्रिट रस्त्यांची झालेली कामे खालील प्रमाणे :-
* सुनोदा ते प्रजिमा -16 रस्ता ,उदळी सब स्टेशन ( एम आर एल-16, व्ही आर-18) लांबी 4.040 कि.मी. अंदाजित किंमत 5 कोटी 50 लक्ष
* सावदा रायपुर पार्ट लांबी – थोरगाव ते रायपुर रस्ता ( टी आर-12, ओ डी आर-19) लांबी 5.030 कि.मी. अंदाजित किंमत 7 कोटी 38
* वाघोदा बीके- दसनूर सिंगनूर ते बालवाडी रस्ता (एल आर 20, व्ही आर 80,30) लांबी 5.025 अंदाजित किंमत 7 कोटी 63 लक्ष
* सुदगाव ते मांगी – चुनवाडा रस्ता ( एम आर एल -15, व्ही आर – 05 ) लांबी 5.835 कि.मी. अंदाजीत किंमत 8 कोटी 31 लक्ष
* राममा -06 ते तालुका बॉर्डर पातोंडी जळगाव (पार्ट लांबी एमपी बॉर्डर ते अंतुर्ली – अंतुर्ली फाटा- पतोंडी- एम पी बॉर्डर) (कि.मी.14/565 ते 23/200) ( टी आर – 05, ओ डी आर – 24) लांबी 6.275 कि.मी. अंदाजीत किंमत 7 कोटी 40 लक्ष
* शेमळदे ते मेळसांगवे रस्ता ( एल आर – 27, व्ही आर-61) लांबी 4.145 कि.मी. अंदाजीत किंमत 6कोटी 68 लक्ष
* आमदगाव ते कोल्हाडी (एल आर -03, व्ही आर – 40) लांबी 4.410 कि.मी. अंदाजित किंमत 6 कोटी 25 लक्ष
* बोदवड – चिखली ते तालुका बॉर्डर रस्ता (भाग लांबी बोदवड ते शेवगा बु. चिखली रस्ता) (टी आर – 03, ओ डी आर 31) लांबी 5.860 कि.मी. अंदाजीत किंमत 6 कोटी 34 लक्ष
असे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 8 कामे मंजूर झालेली असून, संपूर्ण कामांची लांबी 40.620 कि.मी. इतकी आहे. व संपूर्ण कामांची अंदाजित किंमत 55 कोटी 49 लक्ष इतकी आहे.