*देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन*
Thousands of devotees took darshan of Aisaheb Muktai on the occasion of Devshayani Ashadhi Ekadashi
मुक्ताईनगर- आज दि.17 जुलै2034,बुधवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे आईसाहेब मुक्ताईंची आषाढी एकादशी वारी महापूजा व आरती करण्यात आली.त्यानंतर भाविकांसाठी आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन सुरु करण्यात आले.हजारो भाविक आईसाहेबांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते.जे भाविक भगवान श्री विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी आज आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते आज संतांचे दर्शन म्हणजेच देवाचे दर्शन या भावनेने आज आईसाहेब संत मुक्ताईंचे दर्शन घेतात व आपली वारी पूर्ण करतात,त्यामुळे आज भाविकांच्या गर्दीने आईसाहेब मुक्ताई मंदिर व परिसर दुमदुमला होता.
Thousands of devotees took darshan of Aisaheb Muktai on the occasion of Devshayani Ashadhi Ekadashi
मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे,केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार तसेच आ.चंद्रकांत पाटील,मुक्ताईनगर यांनी सुध्दा आज आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला.मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यावतीने 11 फुटाची भव्य अगरबत्ती आईसाहेबांपुढे लावण्यात आली होती.
आईसाहेब मुक्ताईंना श्री नितीन रघुनाथ चौधरी रा.कोथळी यांच्याकडून त्यांच्या शेतातील मोसंबींची आरास करण्यात आली होती,ती आरास सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.आज भाविकांसाठी श्री शरद पाटील रा.बोदवड व श्री राजु पानकर रा.मलकापूर यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.पोलीस प्रशासनानेही सहकार्य करुन आपले योगदान दिले.
YouTube व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी Click Here
Facebook व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी Click Here
Thousands of devotees took darshan of Aisaheb Muktai on the occasion of Devshayani Ashadhi Ekadashi
चातुर्मासातील ही पहिली एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व आहे.आजच्या रोजी लाखाच्या आसपास भाविकांनी आईसाहेब मुक्ताईंच्या दर्शनाचा लाभ घेतला असेल असा अंदाज आहे.