विठ्ठल नामाची शाळा भरली’! तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरात या विद्यार्थ्यांचा नयनरम्य दिंडी सोहळा
युट्यूब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
फेसबुक वरील व्हिडिओ पाहण्यासाठी Click Here
‘विठ्ठल नामाची शाळा भरली’! तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरात या विद्यार्थ्यांचा नयनरम्य दिंडी सोहळा’वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात संत मुक्ताबाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला.
‘वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी बैलगाडी रथावर दिंडी सोहळयात आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संत मुक्ताबाई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा, रुख्मिणी, तर कोणी वासुदेव वारकरी बनले होते. मुलींनी आकर्षक पैठण्या नेसून छान पावली, तुळशी वृंदावन घेऊन सकाळी शाळेच्या मैदानावरुन निघालेला पालखी सोहळा शहरांतून प्रवर्तन चौक ते भुसावळ रोड मार्गे पुन्हा शाळेत सांगता होतं पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच दिंडीसोहळ्याचे देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरव्ही आईसाहेब मुक्ताई यांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत संत विचार रुजविणे आणि भावी पिढी निर्व्यसनी व्हावी यासाठी विविध शाळा प्रयत्न करीत असल्याचे या माध्यनातून दिसून येत आहे.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी मुक्ताईनगर मध्ये अवतरलेले दिसून येत होते . यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
शाळेच्या प्राचार्या व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे तालावर आणि टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेसह दिंडीमार्गावर निर्माण केले. विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. दिंडी आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत ह्या सोहळ्याची सांगता झाली.