मोहरम निमित्त मुक्ताईनगरीत मंगळवारी रात्री ताबूतांची मिरवणूक
व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube युझर्स Click Here
Facebook युझर्स Click Here
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरम ताजिया उत्सवानिमित्त शहरातील विविध भागांमधून मंगळवारी रात्री इस्लामिक कॅलेंडर नुसार 9 तारखेला निघणाऱ्या ( सवारी ) ताबूत मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात सर्व ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक ताबूताबरोबर मालकाच्या इतमामाप्रमाणे डफ, ढोल ताशे व इतर वाद्य देण्यात आले होते.
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या मोहरम ताजिया उत्सवानिमित्त शहरातील विविध भागांमधून ढोल-ताशांच्या गजरात सर्व ताबूताची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक ताबूताबरोबर मालकाच्या इतमामाप्रमाणे वाद्य देण्यात आले होते. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवाची 9 व्या दिवशी रात्रीचे मिरवणुकित शहरातील सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांनी सहभाग घेतला.
मोहरम महिन्यातील पवित्र सण म्हणून मुस्लिम बांधव हा सण दहा दिवस साजरा करतात. पहिले नऊ दिवस मुस्लिम मुस्लिम समाजातील जाणकार मंडळी हुसेन यांच्या बलिदानाच्या कथांचे वाचन करत असतात. शहरातील शीडफार्म, चालीस मोहल्ला , खडकाळी, जोगीवाडा, भिलवाडी भागात हे आयोजन केले गेलेले होते. नवव्या व दहाव्या दिवशी शहीद हुसेन यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी, यासाठी अनेक मुस्लिम बांधव ऐच्छीकपणे रोजा पाळत असतात .
काय आहे इतिहास आणि अख्यायीका
मोहरम म्हणजे हजरत, मोहम्मद पैगंबर, हजरत अली (रजी), हजरत,फातिम (रजी), इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हणजेच ताबूत मानले जाते. इस्लामी नववर्षाची सुरुवात मोहरम सणाने होते. या महिन्यात पैगंबरांचे नातू इमाम हुसेन यांनी बलिदान देऊन इस्लाम जिवंत ठेवण्याचे पवित्र कार्य केले होते, म्हणून मुस्लिम बांधव मोहरमचा सण साजरा करतात.