सर्वांना नमस्कार ,जय मुक्ताई ! मी संतोष मराठे आपले मुक्ताई वार्ता चॅनल वर हार्दिक स्वागत करतो..
पंढरपूर – विधान परिषदच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दि.15 जुलै,सोमवार रोजी पंढरपुर येथे श्री संत मुक्ताबाई मठ येथे भेट दिली व आदिशक्ती मुक्ताईच्या पादुकाचे दर्शन घेतले.
मुक्ताई मठ येथे सर्व वारकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले लाडली बहीण योजना तसेच वारकऱ्यांच्या संदर्भात मोफत यात्रा,पेन्शन योजना सफल मार्गर्दर्शन केले.
संस्थानच्या वतीने प्रतिभाताई पाटील,अंकिताताई पाटील यांनी सत्कार केला तसेच अध्यक्ष ॲड.रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी आभार मानले तसेच ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांनी पंढरपुर येथील मुक्ताई मठ बद्दल माहिती दिली व तेथील समस्याबद्दल चर्चा केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या प्रचार-प्रसार समन्वयक प्रा.डॉ. ज्योतीताई वाघमारे, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यत्मिक सेना,पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे,संत मुक्ताई संस्थान विश्वस्त पंजाबराव प्रल्हादराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, ह.भ.प.विशाल महाराज खोले उपस्थित होते.
तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर वेबसाईट , युट्यूब ,फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक व कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन(Motivation)रुपी आशीर्वाद द्यावे आणि आपले मुक्ताई वार्ता चॅनल युट्यूब ला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती.