See who has been appointed to the post of Jalgaon District President of the State Low Pay Government Employees Union and other posts?
राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदासह इतर पदी कोणा कोणाची झाली नियुक्ती पहा ?
महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ(शासनमान्य) मंत्रालय मुंबई,जळगाव जिल्हा कार्यकारणी ची बैठक व शाखा उद्घाटन मुक्ताईनगर येथे पार पडले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षक डॉ योगेश राणे होते तर उद्घाटन प्रदेश अध्यक्ष गिरीष चौधरी यांच्या हस्ते पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून नासिक जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, कोषाध्यक्ष श्री युवराज महाजन,कार्याध्यक्ष गुलवीर चितोळे,महिला सचिव श्रीमती टिना वाघेला,मुन्नाभाई देशपांडे,दीपक पाटील यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साळी यांनी केले तर आभार रोहन भोई यांनी मानले.
See who has been appointed to the post of Jalgaon District President of the State Low Pay Government Employees Union and other posts?
जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी
प्रदीप काळे यांची नियुक्ती तर
अनिल सुरवाडे (ज्येष्ठ सल्लागार),
किशोर धनगर (जिल्हा उपाध्यक्ष),
विलास टेके (जिल्हा कोषाध्यक्ष),
राजेश नाईक (जिल्हा सचिव),
कादर तडवी (जिल्हा सह सचिव),
नरेश गोयर (खजिनदार),
आत्माराम नागृत (उपाध्यक्ष) पदी नियुक्ती करून प्रदेश अध्यक्ष गिरिष चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी मुक्ताईनगर शाखेच्या अध्यक्षपदी रोहन भोई व महिला अध्यक्ष पदी विजया भोलाने यांची नियुक्ती करण्यात आली.