*सकल मराठा समाज मुक्ताईनगर यांच्या वतीने,विविध समाजातील १० वी व १२ वीच्या गुणवंतांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरव !*
मुक्ताईनगर तालुक्यातील दहावी व बारावी मध्ये नेत्र दीपक यश संपादन करणाऱ्या विविध समाजातील तसेच मराठा समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रभाग क्रमांक 15 मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह समोर पार पडला.
या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील व संत मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष तसेच खंडवा लोकसभा मतदार संघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. व यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संत मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्यासाहेब पाटील तर उद्घाटक म्हणून आमदार चंद्रकांत पाटील प्रमुख अतिथी म्हणून खंडवा लोकसभा मतदार संघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, राज्याचे मापदा प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, मराठा सेवा संघ मध्ये भारत उपाध्यक्ष सुनील महाजन, आबासाहेब पाटील आर एस पाटील ( उद्योजक मध्य प्रदेश इंदोर), विजय साबळे पाटील (संत गजानन महाराज संस्थान विश्वस्त) , संगायो समिति अध्यक्ष बोदवड डॉ उद्धव पाटील, माझी जि प सदस्य रूपाली दिलीप पाटील, माजी सभापती विकास पाटील, माजी सभापती बोदवड गणेश पाटील, राम रोटी आश्रम अध्यक्ष बापूसाहेब किशोर गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर सभापती सचिन पाटील पंचायत समिती सदस्य मुक्ताईनगर सुधाकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, रावेर मराठा विकास मंडळ उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश पाटील, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक निलेश शिरसाट, जिल्हाध्यक्ष किसान सेल सोपान पाटील, भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल जवरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भुसावळ दीपक मराठे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा डॉ.सोपान दुट्टे, सकल मराठा समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, कोषाध्यक्ष वसंत पाटील सर, मराठा सेवा संघ वस्तीगृह राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रमेश तुळशीराम पाटील,शिवाजी मराठे ,नरेंद्र गावंडे, इच्छापुर सरपंच गणेश पाटील, मानमोडी सरपंच सतीश पाटील, काकोडा विनोद पाटील, दीपक वाघ, शैलेंद्र पाटील, पिपरी पंचम सरपंच भास्कर पाटील , दिलीप पाटील, भाऊराव पाटील (धामंदे) संतोष देविदास पाटील, भाऊराव पाटील (बेलसवाडी) सचिन रमेश पाटील, पंढरी मुलांचे, चंद्रकांत कारले, निवृत्ती भड, बिजलाल पाटील (पातोंडी) आदींसह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार छबीलदास पाटील तर आभार प्रदर्शन डिके पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे लखोजीराव जाधव बहुउद्देशीय समाज विकास संस्था मुक्ताईनगर व मराठा सेवा संघ मुक्ताईनगर यांच्यावतीने आता परिश्रम घेण्यात आले.
कार्यक्रमातील काही क्षणचित्रे