संत मुक्ताई मंदिराच्या परिसरात संत मुक्ताई चर्मकार मठाचे आमदार चंद्रकांत पाटलांचे हस्ते लोकार्पण !
आदिशक्ती संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी मुक्ताईनगर परिसरात संत मुक्ताई च्या मंदिराचे हेमाळपंथी जीर्णोदराचे कामा सुरू असून या ठिकाणी असलेल्या पुरातन चर्मकार मठाला थोडावेळ लागले होते. गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून चर्मकार समाजाच्या वारकरी मठाला जागा मिळून येथे आमदारांच्याच पाठपुराव्याने 30 लक्ष रुपयांचे भव्य असे सभागृह बांधकाम पूर्ण झाले या संत मुक्ताई चर्मकार मठ ट्रस्ट कोथळी तालुका मुक्ताईनगर ते लोकार्पण आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते रविवारी दिनांक 30 जून 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
दरम्यान या ठिकाणी संत रोहिदास महाराजांची मूर्ती ची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा तसेच संत मुक्ताई चरित्र व संत रोहिदास महाराज चरित्र पारायण सोहळ्याचे गेल्या 23 जून पासून आयोजन करण्यात आले होते भागवत कथा एडवोकेट कैलास महाराज यांच्या सुश्राव्य वणीतून तर संत मुक्ताई चरित्र वाचन ह भ प मीराताई महाराज शिंगायत व संत रोहिदास महाराज चरित्र वाचन ह भ प पुंडलिक महाराज किनगावकर यांच्या मधुर वाणीतून संपन्न झाले. तसेच कैलास महाराज यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाने रविवारी 30 जून २०२४ रोजी लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व सौ यामिनीताई चंद्रकांत पाटील, शिवसेना रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजनाताई चंद्रकांत पाटील, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील ,युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख छोटू भोई , मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे, किर्तनकार ह भ प दुर्गाताई संतोष मराठे, ह भ प उषाताई महाराज जळगाव,तुळसाबाई जयकर, जळगांव, सावित्रीबाई किनगांव, कमलबाई आसोदा, कुसुमबाई वाळे नाशिक, सिंधुबाई सुखकर जामनेर, दिपालीबाई सुरळकर, कल्पनाबाई सोनोने, निर्मलाबाई सोनोने, रत्नमाला ठोसरे, मंगलाबाई चौधरी महाराज, उषाताई जळगांव, पुष्पाताई जळगांवकर, सरला सुरळकर, विमलबाई चौधरी, मुक्ताबाई सुरळकर, कुसुमताई, पुष्पाबाई, शोभाबाई गुजर, मालती सुर्यवंशी, जामनेर, चंद्रभागाबाई महाराज, हिराबाई, मिराबाई, रखमाबाई कुऱ्हा आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत आईसाहेब मुक्ताबाई चर्मकार मठ ट्रस्ट, कोथळी ता. मुक्ताईनगर जि. जळगांव अध्यक्ष – ह.भ.प. एकनाथ श्रावण शेकोकार, जामनेर उपाध्यक्ष – ह.भ.प. पंडीत निंभोरे महाराज, विश्वस्त (ट्रस्टी) ह.भ.प.संजय निंभोरे, ह.भ.प. अॅड. कैलास महाराज, ब-हाणपुर ह.भ.प. पुंडलिक महाराज तायडे, किनगांव, ह.भ.प.श्री. कांतिलाल वानखेडे, आसोदा, ह.भ.प.श्री. प्रकाश रोझतकर, ह.भ.प. पंढरी सावकारे, जळगांव, ह.भ.प. श्रीमती सिंधुबाई सुरळकर, जामनेर, ह.भ.प. सुनंदाताई घुले, मुक्ताईनगर, ह.भ.प.श्री. रामदास वानखेडे, यावल, ह.भ.प.श्री. आत्माराम सावकारे, मुक्ताईनगर, ह.भ.प.श्री.गलू ठोसरे, भादली, कडू घुले, कैलास शिर्के, निलेश घुले, भागवत शिर्के, संजय निंभोरे, गणेश निंभोरे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय निंभोरे यांनी केले तर आभार ह.भ.प. एकनाथ श्रावण शेकोकार यांनी मानले.