सारोळा येथील शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून केली आत्महत्या
मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी रवींद्र दिनकर जगताप वय 49 या शेतकऱ्याने पीक कर्जाला तसेच नापीकीला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन आत्महत्या केल्याची घटना आठवडा भरापूर्वी घडली होती,
सदरील इसमाने विष प्राशन केल्याचे कळताच त्याला तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जिल्हा रूग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले होते. त्याच्यावर गेल्या मंगळवार पासून उपचार होते मात्र 9 दिवस मृत्यूशी झुंज देत शेवटी काल दि.२६ जून २०२४ बुधवार रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पच्छ्यात आई , पत्नी व दोन मुले असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे जगताप कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.