मोदींची तिसऱ्यांदा शपथ ,खान्देश कन्या रक्षा खडसेंची केंद्रिय राज्य मंत्रिपदाची शपथ
मुक्ताईनगरात ओरिजनल भाजप कार्यकर्त्यांचाही जल्लोष !
भाजप व NDA तील लोकप्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली.तसेच मोदींच्या जंबो मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणुन रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनीही शपथ घेतली. हा आम्हा सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे अशा गगनभेदी घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि.९ जून ला रविवारी प्रवर्तन चौक,मुक्ताईनगर येथे विजयी घोषणाबाजी करत फटाके फोडून तसेच लाडू वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी भाजपचे खरे शिलेदार डी एस चव्हाण सर (जिल्हा उपाध्यक्ष),सौ नजमा तडवी(जिल्हा उपाध्यक्ष),गुणवंत पिवटे (जिल्हा चिटणीस),प्रफुल्ल जवरे(भाजपा तालुकाध्यक्ष),विनोद पाटील(तालुका सरचिटणस),मोहन महाजन(जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा),राजू सवळे(तालुका उपाध्यक्ष),मा,सरपंच, भगवानशिग पवार, गणपत महाजन,डॉ.पवन पाटील,सचिन पाटील,विनोद चौधरी,निखिल भोलानकर,सोमनाथ पाटील,अरुण जावरे,रमेश भलभले,भारत मदने,जीवन राणे, सुनील पाटील,संजय तीतूर.संदीप खिरोळकर,दिलीप पाटील,योगेश सावळे,शुभम काळे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, घरावर तुळशीपत्र ठेवून भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आधीच कधी राष्ट्रवादी तर कधी भाजप अशी डबल ढोलकी वाजवणाऱ्या ऍड रोहिणी खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अधिकृत पदाधिकारी असूनही रक्षा खडसेंचा व मोदी सरकारचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे ओरिजनल कार्यकर्त्यांच्या जल्लोषावर विरजण पडताना दिसून येत होते. मंत्री झालेल्या रक्षा खडसेंनी ओरिजनल आणि डूप्लीकेट कार्यकर्त्यांना ओळखून पुढील कार्य करावे अशी चर्चा मात्र सर्वत्र रंगलेली होती.