खान्देश कन्या रक्षा खडसेंना मिळालं हे खातं ?
Khandesh daughter Raksha Khadse got this account?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जंबो मंत्री मंडळात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचीत खासदार , विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या रक्षाताई खडसे यांनी कालच दि.९ जून २०२४ रविवार रोजी केंद्रीय राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.
मोदी सरकारमध्ये त्या केंद्रिय राज्यमंत्री बनल्या आहेत. काल शपथविधी झाल्यानंतर त्यांना नेमके कोणते मंत्रालय मिळणार ? याबाबत सर्वांना प्रचंड उत्सुकता लागली होती.
Rakshatai Khadse, newly elected Member of Parliament of Raver Lok Sabha Constituency in Prime Minister Narendra Modi’s Jumbo Cabinet, won the hat-trick of victory yesterday on June 9, 2024, Sunday.
She has become Union Minister of State in Modi government. After yesterday’s swearing-in, which ministry will he get? Everyone was very curious about this.
दरम्यान, आज दि.१० जून २०२४ सोमवार रोजी नवनिर्वाचित मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत सायंकाळी खातेवाटप करण्यात आले आहे.
त्यानुसार ना.रक्षाताई खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी मिळाली आहे.
Accordingly, Minister Khadse has been given the responsibility of Sports and Youth Welfare Department.
या खात्याचे कॅबिनेट मंत्री चिराग पासवान आहेत.ना. रक्षाताई खडसे यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर आज प्रथमच त्यांनी आपल्या मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. त्या वयाच्या ३६ व्या वर्षी जळगाव जिल्हयातील चौथ्या तरुण मंत्री बनल्या आहेत.